अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष तयारी केली जाते. या दिवशी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागतात. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली जाते. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले असते आणि दर्शनाच्या वेळांमध्येही बदल केला जातो. या दिवशी काकड आरती, महापूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
advertisement
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये विशेष तयारी केली जाते. यंदा 12 ऑगस्टला अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन केलं आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी 2025 कार्यक्रम -
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे 3.15 वाजेपासून ते 3.50 वाजेपर्यंत आरती, दुपारी 12.15 वाजेपासून ते 12.30 वाजेपर्यंत नैवेद्य संध्याकाळी 7 वाजता धूपारती (दर्शन रांग सुरू असताना धूपारती) रात्री 9 वाजेपासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत नैवेद्य आणि आरती
दर्शनाची वेळ - सोमवार (11 ऑगस्ट) मध्यरात्री 1.30 वाजेपासून ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत. पहाटे 3.50 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. रात्री 9.30 वाजेपासून ते रात्री 11.50 वाजेपर्यंत.
भाविकांना मिळणाऱ्या सोयी - सिद्धिविनायक अॅपद्वारे गणपती बाप्पाच्या दर्शनाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या रांगेसाठी मंडप उभारण्यात येत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे. मुखदर्शन चप्पल स्टँड व्यवस्था सिद्धी प्रवेशद्वाराबाहेरील पार्किंगजवळ करण्यात येणार आहे. गणपती बाप्पाचे दुरुन दर्शनाची व्यवस्था एस.के. बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून करण्यात येणार आहे. मंदिरातर्फे रुग्णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विनामूल्य चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक/नवजात बालक/दिव्यांग व्यक्ती/गरोदर स्त्रिया रांग: रिद्धी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशद्वार क्रमांक 5 गाभारा.
दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ
वाहतुकीच्या सुविधा - मेट्रो LINE - 3 (AQUA LINE) ची सुविधा भाविकांना उपलब्ध असेल. तसेच न्यासातर्फे भाविकांसाठी एकूण 20 खासगी वातानुकूलित बस भाड्याने मागवण्यात येत आहेत. बस मार्ग रवींद्र नाट्य मंदिर ते दादर स्थानक असा असेल