Angaraki sankashti: दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ...

Last Updated:

Angaraki sankashti 2025: नावाचे रहस्य म्हणजे 'अंगारक' हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे. पौराणिक कथेनुसार, मंगळ (अंगारक) ऋषींनी गणपतीची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की...

News18
News18
मुंबई : श्रीगणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानलं जातं. तो दु:खहर्ता आणि सुखकर्ता आहे, अशी उपासकांची गाढ श्रद्धा आहे. ऑगस्ट म्हणजे मराठी श्रावण महिन्यात येणारी संकष्टी ही अंगारक संकष्टी आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व
नावाचे रहस्य म्हणजे 'अंगारक' हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे. पौराणिक कथेनुसार, मंगळ (अंगारक) ऋषींनी गणपतीची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की, जेव्हा जेव्हा चतुर्थी मंगळवारी येईल, तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांचे कल्याण होईल.
advertisement
विशेष लाभ: अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत २० संकष्टी चतुर्थीच्या व्रताइतके फलदायी असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
२०२५ मध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी -
advertisement
तारीख: १२ ऑगस्ट २०२५ (मंगळवार)
चंद्रोदयाची वेळ: रात्री ९ वाजून १७ मिनिटे
अंगारकीची पूजा विधी - 
सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर 'आज मी अंगारकी चतुर्थीचे व्रत करत आहे' असा संकल्प करावा. नंतर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. त्यांना लाल रंगाचे वस्त्र, लाल फुले, दुर्वा, शेंदूर, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. गणपतीला मोदक, लाडू किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा आणि 'श्री गणेशाय नमः' या मंत्राचा जप करावा. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य (पाणी) अर्पण करावे आणि त्यानंतरच उपवास सोडावा. या दिवशी पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Angaraki sankashti: दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement