राहुसाठी गोमेद रत्न (Hessonite Garnet) - राहुचे नकारात्मक परिणाम शांत करण्यासाठी गोमेद रत्न सर्वात प्रभावी मानले जाते. जर हे रत्न योग्य वेळ आणि विधीनुसार धारण केले, तर ते मनाला स्थिरता देते आणि आत्मविश्वास वाढवते. गोमेद परिधान केल्याने व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते आणि करिअरमध्ये वेगाने प्रगती करण्याची संधी मिळते. हे रत्न नकारात्मक ऊर्जा दूर करून जीवनात संतुलन आणि सकारात्मकता आणते.
advertisement
केतूसाठी लहसुनिया रत्न (Cat’s Eye) - केतूच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी लहसुनिया रत्न सर्वात योग्य मानले गेले आहे. हे रत्न व्यक्तीला मानसिक गोंधळ, तणाव आणि द्विधा मनःस्थितीतून बाहेर काढू शकते. हे रत्न योग्य विधीने धारण केल्यास आत्मज्ञान आणि अध्यात्मिकतेला वाढवतं. यामुळे मन एकाग्र होते आणि जीवनाची दिशा योग्य मार्गावर जाते. विशेषतः जे लोक करिअरमध्ये वारंवार अडचणींचा सामना करतात, त्यांच्यासाठी हे रत्न अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
तो दिवस दूर नाही! याच महिन्यात शनि मार्गी झाल्याचा तुमच्या राशीवर असा प्रभाव
धारण करण्यापूर्वी आठवणीनं - रत्नशास्त्रानुसार, गोमेद आणि लहसुनिया ही दोन्ही शक्तिशाली रत्नं आहेत, पण ज्योतिषीय सल्ला घेतल्याशिवाय ती धारण करू नयेत. ती चुकीच्या राशीसाठी किंवा अशुभ वेळी ती धारण केली गेली, तर त्यांचा परिणाम उलटही होऊ शकतो. त्यामुळे, कोणत्याही अनुभवी ज्योतिषाकडून तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करूनच या रत्नांची निवड करणं योग्य ठरतं.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
