लक्ष्मीचा फोटो- दिवाळीच्या शुभप्रसंगी श्री गणेश आणि लक्ष्मीच्या पूजेची परंपरा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि बुद्धीचे देवता गणेश या दोघांची एकत्रित पूजा केली जाते. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करा. लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात. लक्षात ठेवा की या दिवशी कमळावर विराजमान असलेल्या लक्ष्मीला घरी आणणे उत्तम असते.
advertisement
दक्षिणावर्ती शंख - समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या दक्षिणावर्ती शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. या शंखाचा ध्वनी अत्यंत मंगलकारी असतो. धनत्रयोदशीला दक्षिणावर्ती शंख खरेदी करा आणि त्याला घरातील देव्हाऱ्यात ठेवा. दिवाळीत त्याची पूजा करणं खूप फलदायी मानलं जातं.
कुबेर यंत्र - धनत्रयोदशीच्या सणाला घरात कुबेर यंत्राची स्थापना करणंही खूप शुभ असतं. या दिवशी कुबेर यंत्र घेऊन या आणि देव्हाऱ्यात स्थापित करा. यामुळे वर्षभर धनलाभ होईल.
चांदी - चांदी सुख-समृद्धी देणारी धातू मानली जाते. धनत्रयोदशीला चांदीचे दागिने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीच्या पूजेत ही वस्तू देवी लक्ष्मीसमोर ठेवली जाते.
गोमती चक्र - गोमती चक्र एक खास प्रकारचा दगड असतो. तो अनेक रंगांचा असतो, पण पांढरा गोमती चक्र सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही तो रत्नासारखा अंगठीत घालू शकता. धनत्रयोदशीला तुम्ही दोन किंवा पाच गोमती चक्रे खरेदी करू शकता. गोमती चक्र दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केले जाते.
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
कवडी - कवडी समुद्री जीवांचे कवच आहे. धनाचे प्रतीक म्हणून याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. धनत्रयोदशीला पाच किंवा नऊ कवड्या खरेदी करा. कवडी दीपावलीच्या दिवशी अर्पण केल्यास किंवा पूजेत वापरल्यास आर्थिक आघाडीवर लाभ होतो आणि घरात सुख-शांती टिकून राहते.
झाडू - शास्त्रामध्ये झाडूला शुभता आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी त्याची पूजाही करावी. त्यानंतरच त्याचा उपयोग करा.
धणे - धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धणे खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी धणे आणल्यानंतर त्यांना पूजा स्थानी ठेवावे. यामुळे भगवान कुबेर आणि धन्वंतरी प्रसन्न होतात, असे म्हणतात. दिवाळीनंतर सकाळी हे धणे कुंडीत (गमल्यात) लावावे.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)