श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचे व्रत अत्यंत पुण्यकारक मानले जाते. श्रावणी सोमवारचे व्रत केल्यानं भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुलींना चांगला वर मिळवण्यासाठी तसेच विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करण्याची परंपरा आहे. पुरुषसुद्धा मोठ्या भक्तीभावानं हे व्रत करतात. शंकराच्या कृपेसाठी श्रावणी सोमवारचे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी केलेल्या पूजेमुळे आरोग्य, धन, संतती आणि समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
तिसऱ्या श्रावण सोमवारचा पूजा विधी -
सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करून हातात थोडे पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा. महादेवाच्या मंदिरात जाणार नसाल तर देवघरात शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंग उपलब्ध नसल्यास तुम्ही फोटो किंवा प्रतिमा वापरू शकता. शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध आणि साखरेने अभिषेक करावा. अभिषेक करताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करत राहावे. शिवलिंगाला बेलपत्र, पांढरी फुले, अक्षता, चंदन आणि भस्म अर्पण करावे.
21 ऑगस्टपासून या 3 राशीचे लोक जबरदस्त कमावणार; पैसेवाला ग्रह प्रसन्न होणार
श्रावण सोमवारच्या व्रतात शिवामूठ वाहण्याची विशेष परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहिली जाते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर अर्पण करावी. पूजा झाल्यावर भगवान शंकराची आरती करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करावा. पूजेनंतर श्रावण सोमवारची व्रत कथा वाचणे किंवा ऐकणे महत्त्वाचे मानले जाते.
श्रावणी सोमवारी व्रताचे हे नियम पाळावे -
या दिवशी एकभुक्त राहावे. म्हणजे दिवसातून फक्त एकदाच सात्विक भोजन करावे. व्रतादरम्यान कांदा आणि लसूण वर्ज्य असतो. उपवासाच्या वेळी फळे, दूध, दही, राजगिऱ्याचे पदार्थ किंवा साबुदाणा खिचडी खाऊ शकता. हे व्रत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने पाळावे, त्यामुळे भोलेनाथांची आपल्यावर कृपा राहते.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)