कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ शुभ मानला जातो. अशा व्यक्ती बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि मेहनती असतात. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त असते आणि ते प्रत्येक परिस्थितीत स्वतःला नीट हाताळू शकतात. महिलेच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. अशा महिला भाग्यवान असतात आणि आयुष्यात खूप प्रगती करतात. त्यांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. असे लोक मेहनती असतात आणि स्वतःहून मोठी उंची गाठतात.
advertisement
कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ -
कपाळाच्या डाव्या बाजूला म्हणजेच विरुद्ध बाजूला तीळ असलेले लोक शांत आणि संयमी मानले जातात. ते साधेपणासा पसंती देतात. असे लोक त्यांच्या कठोर परिश्रमातून यश मिळवतात. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, परंतु शेवटी, त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे पूर्ण फळ निश्चितच मिळते. या लोकांना पैसे वाचवायला फारसं जमत नाही, कारण त्यांना चांगलं खाणं-पिणं, कपडे आणि आरामदायी जीवन आवडतं.
कपाळाच्या मध्यभागी तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी, म्हणजेच भुवयांच्या दरम्यान तीळ असणं सर्वात शुभ मानला जातं. अशा व्यक्तींना देवाकडून विशेष आशीर्वाद मिळतात. कपाळाच्या मध्यभागी तीळ असलेले लोक भाग्यवान, स्वावलंबी आणि निर्णय घेण्यास सक्षम असतात. त्यांना कौटुंबिक आनंद, वैवाहिक आनंद आणि स्थावर मालमत्तेचे फायदे मिळतात. त्यांची आर्थिक परिस्थिती नेहमी चांगली असते आणि ते जिथे जातात तिथे त्यांना आदर आणि सन्मान मिळतो.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
