रक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणार महत्त्वाचा सण आहे. हा सण भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि आदराचे प्रतीक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार, रक्षाबंधनाची पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी, म्हणजे आज दुपारी २:१२ वाजता सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी, म्हणजे उद्या दुपारी १:२४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, यावेळी रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५ रोजी, शनिवारी म्हणजे उद्या साजरे केले जाईल.
advertisement
रक्षाबंधन २०२५ शुभ मुहूर्त -
रक्षाबंधनला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत असेल, म्हणजे ७ तास ३७ मिनिटे हा मुहूर्त आहे. राखी बांधण्यासाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:२२ ते पहाटे ५:०२ पर्यंत असेल. याशिवाय अभिजीत मुहूर्त दुपारी १२:१७ ते दुपारी १२:५३ पर्यंत असेल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग ९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:४७ ते दुपारी २:२३ पर्यंत असेल.
95 वर्षांनी रक्षाबंधन दिवशी असा शुभ संयोग; नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्यानं..
राखी बांधण्यासाठी -
राखी बांधण्यापूर्वी पूजा ताटात सर्व साहित्य नीट मांडून ठेवावे. राखी बांधण्याच्या वेळी भावाने डोक्यावर रुमाल घालून पाटावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. औक्षण करताना बहिणीनं भावाच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा आणि त्यावर अक्षता लावाव्यात. त्यानंतर निरांजन लावून भावाचे औक्षण करावे. ओवाळून झाल्यावर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना तुम्ही मनात भावासाठी प्रार्थना करू शकता, काही मंत्र म्हणू शकता. राखी बांधल्यावर बहिणीने भावाला मिठाई भरवावी. त्यानंतर भावाने बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देऊन तिला भेटवस्तू किंवा ताटात पैसे ठेवावेत.
जेवणापूर्वी की जेवणानंतर? घरी आलेल्या भावाला कधी राखी बांधणे योग्य ठरेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
