वास्तू तज्ज्ञांच्या मते, खिडक्या योग्य दिशेला आणि योग्य संख्येत असतील तर घरात सुख-शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास चांगलीच मदत होते. परंतु या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात तणाव, आर्थिक अडचणी आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच घर बांधताना किंवा नूतनीकरण करताना खिडक्यांची संख्या-स्थानाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं मानलं जातं.
advertisement
खिडक्यांची संख्या किती असावी?
वास्तू शास्त्रानुसार घरातील खिडक्यांची संख्या सम असावी, म्हणजेच 2, 4, 6 किंवा 8 अशा संख्येला शुभ मानलं जातं. 3, 5, 7 किंवा 9 यांसारख्या विषम संख्येत खिडक्या असणं टाळावं, असं सांगितलं जातं. सम संख्येतील खिडक्यांमुळे ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो, ज्यामुळे मानसिक शांतता, कुटुंबातील सौहार्द आणि आर्थिक स्थिरता मिळते. त्यामुळे घराची रचना करताना हा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार
खिडक्यांच्या योग्य दिशेचं महत्त्व -
खिडक्यांची संख्या जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांची दिशा देखील महत्त्वाची मानली जाते. वास्तू शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशेतील खिडक्या अत्यंत शुभ ठरतात. या दिशांकडून येणारा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात सकारात्मक ऊर्जा आणते. पूर्व दिशेकडील सूर्यकिरण आरोग्य, उत्साह आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानले जातात, तर उत्तर दिशा ही संपत्ती, संधी आणि प्रगतीशी संबंधित आहे. या दिशांना खिडक्या असतील तर घरात आनंद कायम राहतो.
कोणत्या दिशा टाळाव्यात?
वास्तू शास्त्रानुसार दक्षिण आणि नैऋत्य दिशेला मोठ्या किंवा जास्त खिडक्या असणं शक्यतो टाळावं. या दिशांना खिडक्या असल्यास घराची स्थिरता कमी होऊ शकते. याचा परिणाम म्हणून आर्थिक चढ-उतार, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
