देव्हारा नेमका कसा असावा - देव्हारा नेहमी घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर-पूर्व कोपऱ्यामध्ये असावा. ही दिशा पूजा आणि धार्मिक कार्यांसाठी सर्वात शुभ मानली जाते. जर ईशान्य शक्य नसेल, तर पूर्व किंवा उत्तर दिशेला देव्हारा करता येतो. मूर्तीची स्थापना करताना, मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. देव्हारा थेट जमिनीवर असू नये, म्हणजे देव खाली जमिनीवर. देवांचे स्थान जमिनीपासून थोड्या उंचीवर आणि स्वच्छ जागेवर असावे. मूर्ती आपल्या डोळ्यांच्या पातळीपेक्षा जास्त उंचीवर नसाव्यात. देव्हारा नेहमी स्वच्छ ठेवावा. तिथे धूळ किंवा जाळे जमणार नाहीत याची काळजी घ्यावी. देव्हारा कधीही बेडरूम किंवा शौचालयाच्या भिंतीला लागून नसावा. तसेच, देवघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावे.
advertisement
देव्हाऱ्यामध्ये काही देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत, असे सांगितले जाते. देव्हाऱ्यातील मूर्ती जर थोडीही तुटली असेल, खंडित झाली असेल किंवा त्यातील कोणताही भाग खराब झाला असेल, तर ती मूर्ती देव्हाऱ्यात ठेवू नये. अशा मूर्ती नदीमध्ये किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित कराव्यात. एकाच देवतेच्या दोन पेक्षा जास्त मूर्ती किंवा प्रतिमा देवघरात ठेवू नयेत. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असे मानले जाते. घरातील देव्हाऱ्यामध्ये मोठ्या आणि जड मूर्ती ठेवणे टाळावे. देवघरातील मूर्ती शक्यतो हाताच्या अंगठ्याएवढ्या किंवा त्यापेक्षा थोड्या मोठ्या असाव्यात.
उग्र रूपातील देवतांचे फोटो - काही परंपरांनुसार देवी-देवतांच्या उग्र किंवा रौद्र रूपातील मूर्ती (जसे की नरसिंह, भैरव, महाकालीचे काही उग्र रूप) घरातील देव्हाऱ्यात आणि घरात इतर कुठेही लावणे टाळावे, कारण त्यांची पूजा करण्यासाठी विशिष्ट नियम आणि विधी पाळावे लागतात, ते प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. त्यामुळे अशा देवतांचे फोटो घरात लावू नये. देव्हाऱ्याशी संबंधित या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता टिकून राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ मन आणि श्रद्धापूर्वक पूजा करणं ही बाब महत्त्वाची असते.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)