साधारणपणे कोणत्याही सणाला किंवा पूजेला काळे कपडे घालणे अशुभ मानले जात असले, तरी मकर संक्रांतीला मात्र काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्य त्याचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि काळ्या रंगाचा संबंध शनी ग्रहाशी असल्याने, या दिवशी काळे कपडे परिधान केल्याने शनीची विशेष कृपा मिळते. आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मकर संक्रांतीला प्रामुख्याने काळे कपडे घातले जातात. याशिवाय हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो आणि मकर संक्रांतीचा दिवस खूप थंड असतो, अशा वेळी काळे कपडे शरीराला उष्णता देतात, या धार्मिक आणि नैसर्गिक मान्यतेमुळे ही परंपरा आहे.
advertisement
मकर संक्रांतीला तीळ-गुळ आणि खिचडी खाण्याची विशेष परंपरा आहे. तीळ आणि गुळ शरीराला आवश्यक उब देतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांचे सेवन करणे चांगले असते. या दिवशी स्वतः खिचडी खाणे आणि गरीबांना खाऊ घालणे यामुळे सूर्य देव आणि शनी देवांसह सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.
वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा काळ सौर कॅलेंडरनुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दानधर्माला मोठे महत्त्व असते. मकर संक्रांतीला केलेले दान इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. प्रामुख्याने तीळ, गूळ, ब्लँकेट आणि धान्याचे दान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते.
विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होऊ लागतात. यामुळे थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होऊन वसंत ऋतूचे आगमन व्हायला सुरुवात होते. उत्तरायणाच्या या काळात सूर्याची किरणे अधिक प्रखर होतात, जी आरोग्यासाठी आणि पिकांसाठी फायदेशीर असतात.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
