TRENDING:

प्रत्येक भारतीयाच्या दारात उभी राहणार EV कार! किंमतही होतील कमी; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

Last Updated:

अजूनही किंमतीच्या बाबतीत इलेक्ट्रिक गाड्या महाग आहे. पण, आता केंद्र सरकारने नवीन धोरण आणणार आहे. ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होणर आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना जास्त पसंती दिली जात आहे. भारतात सध्या ईलेक्ट्रिक कार आणि बाइकने मार्केट व्यापून टाकलं आहे. स्कुटर, बाईक आणि कार आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये चांगले पर्याय मिळत आहे. सुरुवातील चार्जिंगच्या समस्येमुळे लोक ईव्ही गाड्या खरेदीकडे फारसे वळत नव्हते. पण, आता ईव्ही गाड्यांमध्ये चार्जिंगची समस्या दूर झाली. पण अजूनही किंमतीच्या बाबतीत इलेक्ट्रिक गाड्या महाग आहे. पण, आता केंद्र सरकारने नवीन धोरण आणणार आहे. ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होणर आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॅटरी आहे. ही बॅटरी तयार करण्यासाठी भारत हा चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनची ही मक्तेदारी आता मोडीत निघणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारत आता लवकरच लिथियम आणि निकेल प्रोसेसिंगसाठी अनुदान योजना आणणार आहे. भारतात बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी १५ टक्के रक्कम कॅपिटल सबसिटी म्हणून परत मिळणाार आहे. ही योजना १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणारा आहे. या योजनेमुळे भारतात बॅटरीचं उत्पादन वाढेल आणि बॅटरीच्या किंमतीही कमी होतील.

advertisement

काय आहे भारताची बॅटरी धोरण योजना? 

भारतात ईलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी या परदेशातून आयात कराव्या लागते. जगात चीन हा सर्वात मोठा बॅटरी उत्पादक देश आहे. एकट्या चीनकडे जगभरातल्या उत्पादनापैकी ८० टक्के वाटा आहे. त्यामुळे चीन जो दर ठरवतो, त्यावर सगळे देश अवलंबून आहे. भारताने आता हीच अडचण दूर करण्यासाठी बॅटरीसाठी लागणारा कच्चा माल लिथिनियम आणि निकेल भारतात तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.  जर भारतात बॅटरी तयार करण्यास सुरुवात झाली तर भारतात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीच्या किंमतीत २० ते ३० टक्के कपात होऊ शकते. केंद्र सरकारने बॅटरीचा प्लांट उभारण्यासाठी मदत करणार आहे. या योजनेत ५ वर्षांचा उन्सेंटिव्ह म्हणजे सानुग्रह अनुदान दिला जाईल. ज्या कंपन्यांचा लिथियम प्रोसेसिंग प्लांट्सना त्यांच्या वार्षिक नेट सेल्स टर्नओव्हरच्या 40% पर्यंत आणि निकेल प्लांट्सना 25 टक्क्यांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे.

advertisement

लिथियम आणि निकेल प्रकल्प असे असेल? 

या योजनेनुसार, केंद्र सरकार  २ लिथियम आणि २ निकेलचे मोठे प्रकल्प आणणार आहे, जे 2030 पर्यंत देशाची संपूर्ण मागणी पूर्ण करण्याची क्षमता ठेवतील. मात्र, ही सबसिडी प्रत्येकाला मिळणार नाही. यासाठी सरकारने कडक निकष असणार आहे. लिथियम रिफायनरीची किमान क्षमता 30,000 मेट्रिक टन आणि निकेल रिफायनरीची क्षमता 50,000 मेट्रिक टन असण्याची गरज आहे. ज्या कंपन्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टा मजबूत आहे, अशा कंपन्यांची निवड होणार आहे. भारतात सध्या रिलायन्स, JSW आणि अदानीसारख्या मोठ्या ग्रुप्सचे या सेक्टरमध्ये आधीपासून काम आहे.

advertisement

योजना कशी असेल? 

गट लिथियम  निकल 
अनुदान किती गुंतवणुकीचा 15% गुंतवणुकीचा 15%
जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह सेल्स टर्नओव्हर 40% सेल्स टर्नओव्हर 25%
किमान क्षमता 30,000 मेट्रिक टन 50,000 मेट्रिक टन
प्रभावी तारीख 1 अप्रैल 2026 1 अप्रैल 2026

advertisement

या योजनेसाठी काय आहे गरजेचं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

भारतात जर लिथियम आणि निकेल प्रकल्प उभारायचे असतील तर त्यासाठी सगळ्याच महत्त्वाचे म्हणजे, खनिजांच्या मायनिंगपासून ते प्रक्रियेपर्यंत सगळी व्यवस्था तयार करावी लागणार आहे. भारत सध्या ऑस्ट्रेलिया आणि चिली या दोन देशाकडून लिथियम रिफायनिंग तंत्रज्ञानासाठी चर्चा करत आहे.  ही योजना सध्या कागदावर आाहे, जर प्रत्यक्षात ही योजना भारतात सुरू झाली तर इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती तर कमी होतीलच, निर्यात क्षेत्रातही भारत पाऊल ठेऊ शकतो.

मराठी बातम्या/ऑटो/
प्रत्येक भारतीयाच्या दारात उभी राहणार EV कार! किंमतही होतील कमी; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल