आल्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2001 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 931 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 851 क्विंटल आल्यास 6770 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांद्याची काय स्थिती?
advertisement
शेवग्याचे आवक दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 333 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 303 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 7000 ते 9000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्याची आवक राहिली. त्यास 9000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 189 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये 74 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 10000 ते 13000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 39 क्विंटल डाळिंबास 14000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





