मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अकोल्यातील बारालिंगा गावाजवळ ही घटना घडली आहे. कारमालकाने अलीकडे अकोला मुंबई महामार्गावरील असलेल्या एका हुंदई कंपनीच्या शोरुममध्ये कार खरेदी केली होती. कारची पहिलीच सर्व्हिस होती. त्यामुळे आज सकाळी कार सर्विसिंगसाठी शोरूमला आणली. दुपारी कारची सर्व्हिस पूर्ण झाली. त्यानंतर कारमालकाने ट्रायल घेण्यासाठी कार बाहेर आणली पण काही अंतरावर जाताच कारमधून धूर निघायला लागला. काही कळायच्या आता कारने पेट घेतला. वेळीच कारचालकाने बाहेर उडी मारली. त्यानंतर कारमध्ये आगीनं रौद्ररुपधारण केलं.
advertisement
सुदैवाने प्रसंगवधान घेत गाडीतील सर्व प्रवासी खाली उतरले आणि गाडीने अचानक पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले मात्र या आगीत ही चार चाकी गाडी संपूर्ण जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकल नाही. पण नुकतीच नवीकोरी घेतलेली कार डोळ्यासमोर जळताना पाहून मालक पुरता हादरून गेला होता. या घटनेबद्दल शोरुममधील कर्मचाऱ्याला विचारणा करण्यात आली आहे. कारला आग कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे.
संभाजीनगरात रेल्वे स्टेशन रस्त्यावर द बर्निंग कार
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही कार जळाच्याची घटना घडली. रेल्वे स्थानक परिसरात एका धावत्या चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला गाडीतून सुखरूप बाहेर काढलं. त्यामुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप तरी स्पष्ट नसून मात्र ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.