HSRP म्हणजे काय?
HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही खास प्रकारची नंबर प्लेट असून, यात क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर कोड आणि स्थायिक क्रमांक असतो. ही प्लेट बनावट करणे अवघड असल्याने वाहन चोरी किंवा फसवणूक टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.
कोणत्या वाहनांसाठी गरजेचं आहे?
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना (दोन चाकी, चार चाकी, कमर्शियल) HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.
advertisement
1 एप्रिल 2019 नंतर विक्री झालेल्या वाहनांमध्ये आधीच HSRP बसवलेले असते, त्यामुळे नव्याने घेण्याची गरज नाही.
HSRP का आवश्यक आहे?
चोरी झालेली वाहनं शोधणं यामुळे सोपं होईल. बनावट नंबर प्लेट रोखणे ही यामुळे शक्य, एवढच नाही तर वाहतूक पोलिसांना वाहनाची खरी ओळख पटवणे सोपं जाईल आणि डिजिटल रेकॉर्ड ठेवणे सुलभ होईल.
HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची?
ऑफलाइन: अधिकृत वाहन डीलर किंवा RTO ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा, शुल्क भरा आणि दिलेल्या तारखेला प्लेट बसवा.
ऑनलाइन: अधिकृत वेबसाईटवरूनही अर्ज करता येतो.
HSRP नंबर प्लेटचा खर्च
दोन चाकी वाहन – ₹300 ते ₹500
चार चाकी वाहन – ₹600 ते ₹1,200
कमर्शियल वाहन – ₹1,500 ते ₹2,000
नियमांचे पालन न केल्यास काय होईल?
जर तुम्ही 15 ऑगस्ट 2025 पर्यंत HSRP बसवले नाही, तर वाहतूक पोलिसांकडून ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो.
थोडक्यात: वाहन चोरी रोखणे आणि सुरक्षेसाठी HSRP नंबर प्लेट आवश्यक आहे. वेळेत ती बसवणे तुमच्यासाठी आणि वाहनासाठी सुरक्षित आहे.