कायनेटिक लूनाचं प्रोडक्शन 2000 मध्ये बंद करण्यात आलं होतं. ही मोपेड एकेकाळी एवढी लोकप्रिय होती की, कंपनी दररोज याचे 2,000 यूनिट्स विकत होते. आपल्या पूर्ण जीवनकाळात लूना 50 लाख यूनिट्स विकली होती. तर या गाडीने मोपेड मार्केटमध्य आपली 95% भागीदारी निर्माण केली होती.
तुम्हीही कार चालवता; मग हँडब्रेक कसा वापरायचा माहितीये? जाणून घ्या योग्य पद्धत
advertisement
110 km असेल रेंज
मिळालेल्या माहितीनुसार, कायनेटिक ई-लूनाची रेंज 110 km असू शकते. कंपनीने यामध्ये 2 kWh ची लिथियम आयन बॅटरीचा वापर केला आहे. जी फूल चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. यामध्ये BLDC इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आलाय. लूनाचं जवन हलकं करण्यासाठी याचे बॉडी पार्ट्स अॅल्युमीनियमने तयार करण्यात आलेय. मोपेडचा इलेक्ट्रिक मोटर 22 एनएमचं टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे.
Hyundai च्या जबरदस्त SUV वर मोठी सूट! 2 लाखांच्या डिस्काउंटवर आणा घरी, सोडू नका संधी
आधुनिक फीचर्ससह येते
डिझाइनविषयी बोलायचं झाल्यास या मोपेडचा लूक पहिल्या पेट्रोल मॉडलसारखाच आहे. मात्र ही मॉडर्न फीचर्ससह येते. काही रिपोर्ट्सनुसार, यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, साइड स्टँड कटऑफ स्विच, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिटॅचेबल रियर सीट आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ई-लूनाचा वजन फक्त 96 किलोग्राम आहे. लूना इलेक्ट्रिक मलबेरी रेड आणि ओसन ब्लू सारख्या दोन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात.
कमर्शियल पर्पजसाठी असेल उपलब्ध
विशेष म्हणजे, कायनेटिक ई-लूना सामान्य ग्राहक खरेदी करु शकतील. यासोबतच ही कमर्शियल पर्पजसाठीही विकली जाईल. म्हणजे याचा वापर डिलिव्हरी आणि कार्गो व्हिकल म्हणून केला जाऊ शकेल. याच्या रियर सीट हटवून कार्गो व्हीकलमध्ये कन्वर्ट केले जाऊ शकते. याची सीट हाइट 760 एमएम आहे. ज्यामुळे यावर कमी उंचीचे लोकही सहज बसू शकतील. याच्या पुढे आणि मागे ट्यूब टायरचा वापर करण्यात आला आहे. तर याची लोड कॅपेसिटी 150Kg ची असेल. ई-लूनाची किंमत 70-75 हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.