Hyundai च्या जबरदस्त SUV वर मोठी सूट! 2 लाखांच्या डिस्काउंटवर आणा घरी, सोडू नका संधी

Last Updated:

Hyundai Tucson Discount: ह्युंडई एसयूव्ही खरेदीवर जानेवारी महिन्यात पूर्ण 2 लाख रुपयांची बचत करता येऊ शकते. ट्यूसॉनची किंमत 29.02 लाखांपासून सुरु होते. ही एसयूव्ही 7 रंग आणि दोन व्हेरिएंटमध्ये विक्री होतेय. आयए ट्यूसॉन एसयूव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटवर सविस्तर जाणून घेऊया.

ह्युंडई एसयूव्हीवर मोठं डिस्काउंट
ह्युंडई एसयूव्हीवर मोठं डिस्काउंट
नवी दिल्ली : ह्युंडई मोटर इंडियाचे डीलरशिप या महिन्यात सर्व मॉडल्सवर जबरदस्त डिस्काउंट देताय. या ऑफर अंतर्गत ह्युंडईची प्रीमियम एसयूव्ही Hyundai Tucson चाही समावेश करण्यात आलाय. ह्युंडई ट्यूसॉन एसयूव्हीच्या खरेदीवर जानेवारी महिन्यात पूर्ण 2 लाख रुपयांची बचत केली जाऊ शकते. ही ऑफर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटच्या रुपात दिली जातेय.
भारतीय बाजारात ह्युंडई ट्यूसॉनची किंमत 29.02 लाख रुपया (एक्स-शोरुम)पासून सुरु होते. ही एसयूव्ही 7 रंग आणि दोन व्हेरिएंटमध्ये विक्री होतेय. चला ट्यूसॉन एसयूव्हीवर मिळत असलेल्या सूटविषयी सविस्तर जाणून घ्या.
कोणत्या मॉडलवर किती सूट?
रिपोर्ट्सनुसार ह्युंडई ट्यूसॉनच्या 2023 मॉडल्सवर 2 लाख रुपयांचं कॅश डिस्काउंट दिलं जातंय. तर 2024 मध्ये तयार मॉडल्सवर नगदी सूट केवळ 50,000 रुपये आहे. MY 2024 (मेक ईयर 2024) मॉडल काही दिवसांत डीलरशिपवर पोहोचतील. लक्षात ठेवा की, ह्युंडई ट्यूसॉनवर या ऑफर्स केवळ जानेवारी 2024 पर्यंत लागू आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या ह्युंडई डीलरशिपसोबत संपर्क करु शकता.
advertisement
ह्युंडई ट्यूसॉनचे फीचर्स
ह्युंडई ट्यूसॉनच्या फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये 10.25 इंचांचा टचस्क्रीन डिस्प्ले, 10.25 इंचांचा ड्रायव्हर डिस्प्ले, रिमोट ऑपरेशनसह कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॅनोरमिक सनरुफ आणि ड्यूअल-झोन क्लायमेट कंट्रोलसारख्या फीचर्सचा समावेश आहे. ही एसयूव्ही हीटेड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि वायरलेस फोन चार्जिंगसह येते. प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी ही एसयूव्ही सहा एअरबॅग, 360-डिग्री कॅमेरा आणि अडव्हान्सड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (एडीएएस) सारख्या फीचर्ससह येते.
advertisement
ह्युंडई ट्यूसॉनचं इंजिन
ट्यूसॉनमध्ये दोन इंजिन ऑप्शन मिळतात. ज्यामध्ये पहिला 2-लीटर डिझेल (184पीएस/416 एनएम) आणि दुसरा 2-लीटर पेट्रोल यूनिट (156 पीएस/192 एनएम) आहे. डिझेल इंजिनसह 8-स्पीड ऑटोमॅटिक आणि पेट्रोलसह 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. टॉप-अँड डीझेल इंजिनमध्ये ऑल-व्हील-ड्रायव्हट्रेन (AWD)चा ऑप्शनही दिला गेलाय.
मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai च्या जबरदस्त SUV वर मोठी सूट! 2 लाखांच्या डिस्काउंटवर आणा घरी, सोडू नका संधी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement