लवकरच लॉन्च होणार ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची पहिली CNG कार! मिळेल 5-स्टारची सेफ्टी; बुकिंग सुरु

Last Updated:

टाटा मोटर्सने नुकतीच Tigor iCNG आणि Tiago iCNG ला ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आणण्याचा खुलासा केलाय. यासोबतच कंपनीने या मॉडलसाठी बुकिंग घेणंही सुरु केलंय. टाटाच्या सर्व सीएनजी कार ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजीसह येतात.

टाटा टियागो कार
टाटा टियागो कार
नवी दिल्ली : टाटा मोटर्स देशातील पहिली अशी कार आहे जी सीएनजी व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल. कंपनीने नुकतीच Tigor iCNG आणि Tiago iCNG ला ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आणण्याचा खुलासा केलाय. यासोबतच कंपनीने या मॉडल्ससाठी बुकिंग घेणंही सुरु केलंय. इच्छुक ग्राहक 21,000 रुपये अमाउंटसह या कारची बुकिंग टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलरशिपवर किंवा ऑनलाइनही करु शकतात.
टियागो, टिगोरचे iCNG व्हेरिएंट्स
नवीन टियागो iCNG AMT तीन व्हेरिएंट (XTA CNG, XZA+ CNG आणि XZA NRG)मध्ये उपलब्ध आहे. तर टिगोर iCNG AMT दोन व्हेरिएंट (XZA CNG आणि XZA+ CNG) मध्ये खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजीसह येते
टाटाच्या सर्व सीएनजी कार ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजीसह येतात. या टेक्नॉलॉजीचा वापर कारमध्ये एक्स्ट्रा स्पेस देण्यासाठी केला जातो. ज्या अंतर्गत एक मोठ्या सिलिंडर ऐवजी दोन लहान सिलिंडर लावले जातता. यामुळे बूटमध्ये थोडी अधिक जागा मिळते. पेट्रोल ते सीएनजी मोडवर स्विच करण्यासाठी कार एक सिंगल अ‍ॅडव्हान्सड ईसीयूसह येतात. त्यांना डायरेक्ट मोडमध्ये स्टर्ड केला जाऊ शकतो.
advertisement
अडव्हान्सड सेफ्टी फीचर्स
या कारमध्ये सेफ्टी फीचर्स म्हणून एक मायक्रो स्विचही देण्यात आलाय. जो इंधन भरताना कारला बंद करतो. यासोबतच सिलिंडर कंम्पार्टमेंटमध्ये एक्स्ट्रा थर्मल प्रोटेक्शनही मिळते. गॅस लीक रोखण्यासाठी iCNG किटमध्ये अडव्हान्स्डचा वापर केला गेलाय. तर यामध्ये लीकेजची माहिती घेणारं फीचरही उपलब्ध आहे. जो कारला तत्काळ पेट्रोल मोडवर स्विच करतो.
advertisement
इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स
टियागो आणि टिगोर iCNG AMT कारमध्ये 1.2 लिटर रेवोट्रॉन इंजिन उपलब्ध आहे. यासोबतच, टाटा मोटर्सने या मॉडल्ससाठी नवीन कलर ऑप्शनही लॉन्च केलेय. दोन्ही iCNG कारमध्ये 26 किलोमीटर प्रति किलो मायलेज मिळते. टिगोर आउट टियाग ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये क्रमशः 5 स्टार आणि 4 स्टारची सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. कंपनीनुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सीएनजी मार्केटमध्ये 40.5 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
लवकरच लॉन्च होणार ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची पहिली CNG कार! मिळेल 5-स्टारची सेफ्टी; बुकिंग सुरु
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement