भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार, काय आहे किंमत आणि खासियत?

Last Updated:

भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत आहे. ग्राहकांचा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार
भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार
नवी दिल्ली : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत आहे. ग्राहकांचा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात ईव्ही आपला दबदबा निर्माण करत आहेत. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत असल्याने देशभरात ईव्हीच्या विक्रीत वाढ पाहायला मिळत आहे. ईव्हीमुळे प्रदूषण होत नाही आणि ती पेट्रोल व डिझेल वाहनांच्या तुलनेत खिशाला परवडणारी असते; पण आज आपण भारतातल्या सर्वांत महागड्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत.
अल्ट्रा लक्झरी इलेक्ट्रिक कारने भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. ती कार आहे रोल्स रॉइस स्पेक्टर. ही कार अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली आहे. ही दोन दरवाजांची इलेक्ट्रिक कूप भारतातली सर्वांत महागडी इलेक्ट्रिक कार आहे. तिचे काही फोटो आणि माहिती समोर आली आहे. स्पेक्टर या कारच्या माध्यमातून रोल्स-रॉइस या वाहन उत्पादक कंपनीने भारतातल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. या कारची किंमत 7.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही किंमत कलिनन व फँटम यांच्यादरम्यान आहे.
advertisement
स्पेक्टरमध्ये 102kWh बॅटरी पॅक आहे. यात प्रत्येक अॅक्सलवर दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. त्या 585bhp ची एकत्रित पॉवर आणि 900Nm चं टॉर्क आउटपुट देतात. स्पेक्टरची बॅटरी 195 किलोवॅटच्या चार्जरने केवळ 34 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. त्याच वेळी 50kW DC चार्जरने बॅटरी 95 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येऊ शकते.
advertisement
या इलेक्ट्रिक कूप कारमध्ये मोठी फ्रंट लोखंडी ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प सेटअपसह अल्ट्रा-स्लिम एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), एरो-ट्यून्ड स्पिरिट ऑफ एक्स्टसी, बोल्ड शोल्डर लाइन्स आणि स्लोपिंग रुलाइन आहेत. ही कार 4-व्हील स्टीअरिंग आणि अॅक्टिव्ह सस्पेंशन आहे. स्पेक्टरचं डिझाइन रोल्स-रॉइसचा टाइमलेस एलिगन्स आणि एअरोडायनॅमिक इफिशियन्सी दाखवतं. यात 23 इंच एरो-ट्यून व्हील्स आहेत.
advertisement
रोल्स रॉइस ही भारतात लोकप्रिय असलेल्या महागड्या व ब्रँडेड कारपैकी एक आहे. अनेक सेलिब्रिटी व उद्योगपती या कारला पसंती देतात. या कंपनीने आता इलेक्ट्रिक व्हेइकल निर्मितीस सुरुवात केली आहे. त्याचा भाग म्हणून त्यांनी रोल्स रॉइस स्पेक्टर ही पहिली ईव्ही भारतात लाँच केली आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार, काय आहे किंमत आणि खासियत?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement