Budget Car : कुटुंबासाठी 7 सीटर कार घ्यायचीय? 'हे' आहेत बजेट फ्रेंडली आणि बेस्ट पर्याय

Last Updated:

तुम्ही नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचं बजेट 10 लाख रुपये असेल तर या किमतीतल्या सर्वोत्तम कारचे ऑप्शन्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

budget car
budget car
मुंबई : कार घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुटुंब मोठं असेल तर ते चांगल्या 7 सीटर कारच्या शोधात असतात. तुम्ही नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचं बजेट 10 लाख रुपये असेल तर या किमतीतल्या सर्वोत्तम कारचे ऑप्शन्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या यादीतून तुम्ही तुमचं बजेट, हवी असलेली फीचर्स व तुम्हाला हव्या त्या कंपनीची कार निवडू शकता. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'एबीपी लाइव्ह'ने दिलं आहे.
रेनॉ ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 6.33 लाख रुपये ते 8.97 लाख रुपये आहे. यात 1-L NA पेट्रोल इंजिन आहे. ते 72PS/96Nm आउटपुट जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी यात 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध आहेत. या कारचं मायलेज 18.2 kmpl ते 20 kmpl आहे. ही कारही 7 सीटर आहे.
मारुती अर्टिगाची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये ते 13.08 लाख रुपये आहे. यात माइल्ड हायब्रिडसह 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे. ते 103PS/168NM चं आउटपुट जनरेट करू शकतं. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय उपलब्ध आहे. या कारचं मायलेज 20.3 kmpl ते 26.11 kmpl आहे. तिची सीटिंग कपॅसिटी 7 जणांची आहे.
advertisement
महिंद्रा बोलेरोची एक्स-शोरूम किंमत 9.79 लाख रुपये ते 10.80 लाख रुपये आहे. यात 1.5 लीटर टर्बोचार्ज केलेलं डिझेल इंजिन आहे. ते 75 पीएस आणि 210 Nm चं आउटपुट जनरेट करू शकतं. ही कार 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. तिचं मायलेज 16.7 kmplपर्यंत आहे. ही सेव्हन सीटर एसयूव्ही आहे.
किओ कॅरेन्सची एक्स-शोरूम किंमत 10.84 लाख रुपये ते 19.13 लाख रुपये आहे. यात 3 इंजिन ऑप्शन्स मिळतात. त्यात 1.5 लिटर पेट्रोल (115PS/144Nm), 1.5-L टर्बो पेट्रोल (160PS/253Nm) आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन (115PS/250Nm) यांचा समावेश आहे. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड iMT, 7-स्पीड डीसीटी, 6-स्पीड एएमटीचे पर्याय उपलब्ध आहेत. कारचं मायलेज 17.9 kmpl ते 21 kmpl पर्यंत आहे. ही 7-सीटर एसयूव्ही आहे. ती 6 एअरबॅग्जसह येते.
मराठी बातम्या/ऑटो/
Budget Car : कुटुंबासाठी 7 सीटर कार घ्यायचीय? 'हे' आहेत बजेट फ्रेंडली आणि बेस्ट पर्याय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement