थारचं 5 डोअर व्हॅरिएंट अनेकदा स्पॉट झालं आहे. नवीन गाडीच्या व्हीलबेसचा आकार सध्याच्या मॉडेलपेक्षा काहीसा लांब आहे. लेटेस्ट स्पाय शॉट्समध्ये दिसलेल्या थारमध्ये नवीन अॅलॉय व्हील्स आहेत. डायमंड कट आकाराची ही अॅलॉय व्हील्स प्रॉडक्शन मॉडेलमध्ये बसवलेली आहेत. महिंद्रा थार 5 डोअर टेस्टिंग म्युलमध्ये गोल आकाराचे एलईडी असलेले डीआरएल लावण्यात आले आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो, की ही एसयूव्ही प्रॉडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात आहे. याशिवाय, लांब व्हीलबेसमुळे थार 5 डोअरमध्ये जास्त बूटस्पेस असणं अपेक्षित आहे.
advertisement
महिंद्रा थार 5 डोअरच्या स्पॉटेड प्रॉडक्शन मॉडेलच्या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी एक्स्टेंडेड इन्फोटेन्मेंट सिस्टीम, फ्रंट सीट्सना सेंट्रल आर्मरेस्ट, हाइट अॅडजस्टेबल सीटबेल्ट आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारखी फीचर्स या गाडीमध्ये मिळू शकतात.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिंद्रा थार 5 डोअरमध्ये 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. पूर्वीच्या थार मॉडेलच्या तुलनेत या नवीन गाडीच्या इंजिनमध्ये काही अपडेट्स केले जाणार आहेत. या इंजिनसोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 4×4 पर्यायही दिला जाऊ शकतो. याशिवाय बेस मॉडेलसाठी कंपनी रिअर व्हील ड्राइव्हचा पर्यायही देऊ शकते.
सध्या भारतामध्ये 5-डोअर सेक्शनमध्ये 'मारुती सुझुकी जिम्नी' ही गाडी लोकप्रिय आहे. त्यामुळे महिंद्रा थार 5 डोअर लाँच झाल्यानंतर या दोन गाड्यांची थेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, अद्याप लाँच न झालेल्या 'फोर्स गुरखा 5 डोअर' व्हॅरिएंटशीदेखील थारची स्पर्धा असेल.