cars : जास्त मायलेज देणारी मारुतीची 'ही' कार घेऊन जा फक्त एका लाखांमध्ये, शोरूममध्ये आहे 6 लाख किंमत!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 7.42 लाख रुपयांपर्यंत जाते.
दिल्ली, 27 डिसेंबर : नवीन वर्षात एखादी चांगली गाडी घेण्याचं स्वप्न पाहत असाल, पण बजेट नसेल, तर सेकंड हँड कारचा पर्याय चांगला ठरू शकतो. मारुती वॅगन-आर ही कार अनेकांच्या पसंतीस उतरलेली आहे. शोरूममध्ये या गाडीची किंमत अंदाजे 6 लाख रुपयांच्या आसपास आहे. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ही गाडी हवी असेल, तर ऑनलाइन वेबसाइट्सवर या गाडीच्या सेकंड हँड मॉडेलसाठी बेस्ट डील मिळू शकतं. त्यात तुम्हाला निम्म्यापेक्षाही कमी किमतीत म्हणजे अंदाजे एक लाख रुपयांना ही गाडी मिळू शकते.
हॅचबॅक कार्सना भारतात भरपूर पसंती मिळते. यात कमी किमतीच्या नव्यानं दाखल होणाऱ्या गाड्यांबरोबरच प्रीमियम डिझाइन आणि फीचर्स असलेल्याही भरपूर गाड्या आहेत. यापैकीच एक कार म्हणजे मारुतीची वॅगन-आर. नोव्हेंबरमध्ये ही बेस्ट सेलिंग कार होती. वॅगन-आरची केवळ परवडणारी किंमतच नव्हे, तर तिचं डिझाइन आणि मायलेजही ग्राहकांना आवडतं.
या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 7.42 लाख रुपयांपर्यंत जाते. ही गाडी घ्यायची असेल आणि बजेट नसेल, तर सेकंड हँड गाडी घेण्याचा एक पर्याय आहे. ऑनलाइन वेबसाइट्सवर या गाडीची अनेक चांगली डील्स मिळू शकतात.
advertisement
या कारवर सगळ्यात स्वस्त डील OLX च्या वेबसाइटवर मिळतं आहे. तिथे या कारचं 2011 चं मॉडेल नोंदवण्यात आलंय. गाडीचं रजिस्ट्रेशन दिल्लीचं असून, पहिल्याच मालकाची गाडी आहे. विकणाऱ्यानं या कारची किंमत 1.10 लाख रुपये निश्चित केलीय. या खरेदीवर इतर कोणतीही ऑफर मिळणार नाही.
advertisement
याच गाडीबद्दल DROOM या वेबसाइटवरही एक डील आहे. तिथली गाडीही दिल्लीमध्ये रजिस्टर केलेली आहे आणि गाडीचं मॉडेल 2012 चं आहे. विकणाऱ्याने या गाडीसाठी 1.80 लाख रुपयांची किंमत निश्चित केलीय. विकणाऱ्याने या गाडीच्या विक्रीवर एक फायनान्स ऑफरही देऊ केलीय. या गाडीवरची आणखी एक ऑफर QUIKR या वेबसाइटने दिली आहे. तिथे या कारचं 2014चं मॉडेल रजिस्टर करण्यात आलंय. त्याचं रजिस्ट्रेशन हरियाणातल्या गुरुग्राममधलं आहे. या गाडीची किंमत 2.5 लाख रुपये निश्चित करण्यात आलीय. या गाडीसोबतही फायनान्स योजना मिळणार आहे.
advertisement
सेकंड हँड कार हा परवडणारा पर्याय असतो. मारुती वॅगन-आरच्या उपलब्ध डील्समधून तुम्हीही तुमचं बजेट व आवडीनुसार एक डील निवडू शकता; मात्र कोणतीही सेकंड हँड गाडी घेण्याआधी ती प्रत्यक्ष एकदा तरी पाहणं व तिची कागदपत्रं तपासणं गरजेचं असतं. यामुळे भविष्यातला धोका टाळणं शक्य होतं.
Location :
Delhi
First Published :
December 27, 2023 8:34 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
cars : जास्त मायलेज देणारी मारुतीची 'ही' कार घेऊन जा फक्त एका लाखांमध्ये, शोरूममध्ये आहे 6 लाख किंमत!