Nexon, Creta आणि Brezzaची स्वप्न पाहणं सोडा, त्याच किंमतीत घ्या नवी XUV कार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ata Nexon, Hyundai Creta आणि Maruti Suzuki Brezza सारख्या खरेदी करण्याकडे लोकांचा सर्वाधिक कल आहे. इतर गाड्यांपेक्षा चांगलं तंत्रज्ञान आणि फिचर्स या गाडयांमध्ये मिळतात.
मुंबई, 27 डिसेंबर : SUV गाड्यांची क्रेझ भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. एडव्हेंचर गाड्या घेण्याऐवजी SUV फॅमिली कार घेणं लोक पसंत करत आहेत. या गाड्या सर्वासमान्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत. त्यामुळे अनेक लोक SUV गाड्या खरेदी करताना दिसत आहेत. कमी बजेटमध्ये मायक्रो एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट SUV गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. ata Nexon, Hyundai Creta आणि Maruti Suzuki Brezza सारख्या खरेदी करण्याकडे लोकांचा सर्वाधिक कल आहे. इतर गाड्यांपेक्षा चांगलं तंत्रज्ञान आणि फिचर्स या गाडयांमध्ये मिळतात.
XUV 700 या गाडीबद्दल जाणून घेऊयात. तुम्ही SUV गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही XUV700 गाडीचं बेस व्हेरिएंट MX खरेदी करू शकता.ही गाडी तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल इंजिनच्या पर्यायांसह मिळेल. या गाडीसाठी किती पैसे खर्च होतील त्याचे फिचर्स काय आहेत पाहूयात.
हेही वाचा - इतक्या स्वस्त CNG कार पुन्हा मिळणार नाहीत! कंपन्या देतायेत भरभरून डिस्काउंट; फक्त 7 दिवसच संधी
advertisement
XUV700 च्या बेस व्हेरियंटमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, उंची अॅडजस्टेबल सीट्स, AC, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, ABS, EBD सारखे अनेक पर्याय मिळतील.
XUV700 च्या बेस व्हेरियंटमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. गाडीमध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह देण्यात आलं आहे. तर दुसरं डिझेल इंजिन 2.1 लिटरचं असून यात फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यात उपलब्ध आहे.
advertisement
XUV700 या गाडीच्या पेट्रोल वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14.03 लाख रुपये आहे. तर डिझेल गाडीची किंमत एक्स-शोरूम 14.47 लाख रूपये आहे. Nexon च्या टॉप वेरिएंटमध्ये ही गाडी तुम्हाला 15.50 लाख रुपयांमध्ये मिळेल. तर Creta च्या टॉप व्हेरिएंटमध्ये या गाडीची एक्स शो रूम किंमत 19.20 लाखरूपये आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2023 4:59 PM IST