Fact Check: Tata मोटर्स खरंच 20 हजारांमध्ये Bike करणार लाँच? अखेर टाटाने केला मोठा खुलासा

Last Updated:

अशातच टाटा मोटर्स आता दुचाकी सुद्धा आणणारी अशी चर्चा रंगली होती. पण, टाटाने अखेर यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

News18
News18
मुंबई : भारतातील सर्वात मोठी चारचाकी वाहन उत्पादक कंपनी असलेली टाटा मोटर्सने मजबूत आणि दमदार अशा गाड्या लाँच करून कारची सेफ्टी किती महत्त्वाची असते हे दाखवून दिलं. एवढंच नाहीतर मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून टाटाने आजपर्यंत अनेक स्वस्त आणि मजबूत अशा कार लाँच केल्या आणि लोकांनी त्या पसंतही केल्या. पण, अशातच टाटा मोटर्स आता दुचाकी सुद्धा आणणारी अशी चर्चा रंगली होती. पण, टाटाने अखेर यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मजबूत आणि दमदार अशा कार तयार करणारी टाटा मोटर्स आता बाईक सुद्धा आणणारी अशी बातमी वाऱ्या सारखी पसरली. एवढंच नाहीतर बाईकचे फोटो, फिचर्स आणि किंमत सुद्धा जाहीर करण्यात आली होती. हा सगळा प्रकार मीडियाच्या हवाल्याने देण्यात आला होता. ही बाईक सगळ्यात स्वस्त आणि मायलेज किंग असणार अशा वावड्याही उठवण्यात आल्या. एवढंच नाहीतर ही बाईक २० ते ३० हजार रुपये किंमत असणार असंही सांगितलं गेलं.
advertisement
आता टाटा मोटर्स जर बाईक लाँच करणार असेल तर साहजिक ती मजबूत आणि पॉवरफुल असेल अशी शक्यता गृहीत धरली गेली.  पण टाटा मोटर्सने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
टाटा मोटर्सही सर्वात मोठी चारचाकी उत्पादक कंपनी आहे. आम्ही दुचाकी उत्पादनामध्ये कोणतीही अशी तयारी केली नाही. टाटा मोटर्सकडून असा कोणताही प्लॅन नाही. जर तसं असतं तर अधिकृतरित्या जाहीर केलं असतं. पण, आमचा दुचाकी उत्पादन करण्याचा असा कोणताही प्लॅन नाही, असं टाटा मोटर्सने अखेरीस स्पष्ट केलं आहे. त्यामुळे टाटा मोटर्सची बाईक येणार ही बातमी धांदात खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
टाटा मोटर्सची बाईकचे फोटो कसे आले?
व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये टाटा मोटर्सचा लोगो असलेली बाईक दिसत आहे. १०० सीसी आणि १२५ सीसी क्षमतेच्या या बाईक असणार असं भासवण्यात आलं होतं. पण, हे सगळे फोटो AI मार्फत तयार करण्यात आले होते. टाटा मोटर्सनेही या बाईकच्या फोटोबद्दल स्पष्ट नकार दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Fact Check: Tata मोटर्स खरंच 20 हजारांमध्ये Bike करणार लाँच? अखेर टाटाने केला मोठा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement