IND vs SA Final : मैदानात व्हिलचेअरवर आली, पण PM मोदींसमोर ती प्लास्टर लावलेल्या पायावर राहिली उभी, भेटीचे PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या विजयानंतर भारताची एक खेळाडू व्हिलचेअरवरून मैदानात आली होती.त्यावेळी सर्व लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं होतं.आज तीच खेळाडू इतर महिला खेळाडूंसह पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला गेली होती.
Womens World Cup Winning Team Meet PM Narendra Modi : टीम इंडियाने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. या विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष थांबता थांबत नाही आहे. त्यात टीम इंडियाच्या विजयानंतर भारताची एक खेळाडू व्हिलचेअरवरून मैदानात आली होती.त्यावेळी सर्व लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं होतं.आज तीच खेळाडू इतर महिला खेळाडूंसह पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला गेली होती.यावेळी तिने प्लास्टर लावलेल्या पायाने कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
खरं तर भारताने नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. या विजयानंतर भारताची सलामीवीर प्रतिका रावल ही व्हिलचेअरवरून मैदानात सेलीब्रेशन करायला आली होती. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले होते.ट्रॉफी स्विकारताना देखील ती खेळाडूसोबत डायसवर होत. विशेष म्हणजे सलामी पार्टनर स्मृती मानधनाच तिला डायसवर घेऊन गेली होती.
advertisement
Team India presented a signed NaMo jersey to PM Narendra Modi. 🇮🇳 pic.twitter.com/6yTKMIxUge
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2025
आता हीच प्रतिका रावल इतर खेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली होती.या दरम्यान भारतीय महिला खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबस फोटोसेशन केले होते. या फोटो सेशन दरम्यान प्रतिका रावल देखील उपस्थित होते. प्रतिका रावल यावेळी पायाला प्लास्टर लावून आली होती.तसेच फोटोसेशन दरम्यान ती पायावरही उभी राहिली होती.
advertisement
दरम्यान प्रतिका रावल हीने वर्ल्ड कप स्पर्धेत उत्कृष्ट खेळी केली होती. तिने या स्पर्धेत 308 धावा केल्या होत्या.यानंतर सेमी फायनल आधी ती दुखापतीमळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली होती.त्यामुळे तिच्या जागी शफाली वर्माला टीम इंडियात संधी मिळाली होती.
महिला विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना "नमो १" लिहिलेली एक खास जर्सी भेट दिली. संपूर्ण संघाने स्वाक्षरी केलेली ही जर्सी पंतप्रधानांबद्दल आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक होती. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी संघाचे स्वागत केले आणि त्यांचा ऐतिहासिक विजय साजरा केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 11:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : मैदानात व्हिलचेअरवर आली, पण PM मोदींसमोर ती प्लास्टर लावलेल्या पायावर राहिली उभी, भेटीचे PHOTO


