वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या दीप्ती शर्माला सोडलं, हरमन, स्मृती, जेमिमाचं काय? WPL ची शॉकिंग रिटेनशन लिस्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आगामी WPL सिझनसाठी सगळ्या 5 फ्रॅन्चायजींनी त्यांनी रिटेन केलेल्या तसंच रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी दिली आहे.
मुंबई : आगामी WPL सिझनसाठी सगळ्या 5 फ्रॅन्चायजींनी त्यांनी रिटेन केलेल्या तसंच रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी दिली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सने आणि दिल्ली कॅपिटल्सने 5-5 खेळाडूंना रिटेन केलं आहे, तर आरसीबीने 4 खेळाडूंना, गुजरातने 2 आणि यूपीने एका खेळाडूला रिटेन केलं आहे.
ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली आणि मॅग लेनिंगसोबतच न्यूझीलंडची ऑलराऊंडर अमेलिया केरला रिलीज करण्यात आली आहे. रिलीज करण्यात आलेलं सगळ्यात धक्कादायक नाव म्हणजे वर्ल्ड कपमधली प्लेअर ऑफ द सीरिज असलेली दीप्ती शर्मा. दीप्तीने 2025 मध्ये हिलीच्या गैरहजेरीत वॉरियर्सचं नेतृत्व केलं होतं, पण आता दीप्ती लिलावामध्ये सहभागी होणार आहे.
टीमनी रिटेन केलेले खेळाडू
advertisement
दिल्ली कॅपिटल्स : एनाबेल सदरलँड, मारिजान काप, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, निकी प्रसाद
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर, नॅट सिव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, जी कमलिनी, हेली मॅथ्यूज
आरसीबी : स्मृती मंधाना, एलिस पेरी, ऋचा घोष, श्रेयंका पाटील
गुजरात जाएंट्स : एश्ली गार्डनर, बेथ मुनी
यूपी वॉरियर्स : श्वेता सहरावत
रिटेन स्लॅबची घोषणा
advertisement
27 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये महिला प्रीमियर लीगचा मेगा ऑक्शन होणार आहे. प्रत्येक फ्रॅन्चायजीला 15 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. तसंच रिटेशन स्लॅबचीही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार रिटेन केलेल्या पहिल्या खेळाडूला 3.5 कोटी, दुसऱ्या खेळाडूला 2.5 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला 1.75 कोटी रुपये, चौथ्या खेळाडूला 1 कोटी आणि पाचव्या खेळाडूला 50 लाख रुपये दिले जातील.
advertisement
टीमकडे किती पैसे उरणार?
पाच खेळाडू रिटेन करणाऱ्या टीमकडे 15 कोटी रुपयांपैकी 9.25 कोटी रुपये खर्च करावे लागतील. तर चार खेळाडू रिटेन करणाऱ्या टीमला 8.75 कोटी, तीन खेळाडू रिटेन करणाऱ्या टीमला 7.75 कोटी, दोन खेळाडू रिटेन करणाऱ्या टीमना 6 कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यावर 3.5 कोटी रुपये खर्च करावे लागतील. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सनी 5-5 खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांच्याकडे टीम बनवायला 5.75 कोटी रुपये असतील. तसंच त्यांच्याकडे राईट टू मॅच कार्ड उपलब्ध नसेल.
advertisement
युपी वॉरियर्सकडे सर्वाधिक 14.5 कोटी रुपये आणि चार राईट टू मॅच कार्ड असतील. गुजरात जाएंट्स फक्त भारतीय खेळाडूंसाठी तीन आरटीएम वापरू शकतं, तसंच लिलावामध्ये त्यांना जास्तीत जास्त 9 कोटी रुपये असतील. आरसीबीकडे एक आरटीएम आणि 6.25 कोटी रुपयांची पर्स असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 11:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या दीप्ती शर्माला सोडलं, हरमन, स्मृती, जेमिमाचं काय? WPL ची शॉकिंग रिटेनशन लिस्ट!


