TRENDING:

Toyota ला थेट भिडणार, Mercedes ची आली V-Class 6-सीटर, किंमत किती? Video

Last Updated:

एमपीव्ही सेगमेंटमध्ये बॉस मानली जाणारी V-Class आता 2026 मॉडेलसह अधिक आधुनिक फीचर्स आणि लक्झरी अनुभव घेऊन परतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय लक्झरी कार बाजारपेठेत पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी जर्मन कंपनी Mercedes-Benz ने आपली प्रीमियम एमपीव्ही Mercedes-Benz V-Class नव्या दमात बाजारात आणली आहे. एमपीव्ही सेगमेंटमध्ये बॉस मानली जाणारी V-Class आता 2026 मॉडेलसह अधिक आधुनिक फीचर्स आणि लक्झरी अनुभव घेऊन परतली आहे. 2 मार्च रोजी मुंबईतील बीकेसी येथे या गाडीचे अधिकृत लॉन्चिंग करण्यात आले. या नव्या मॉडेलमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, कोणती नवीन फीचर्स मिळणार आहेत आणि किंमत किती आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊ.
advertisement

इंटिरियर – टेक्नॉलॉजी आणि लक्झरीचा संगम

V-Class 2026 च्या केबिनमध्ये बसताच सर्वप्रथम लक्ष वेधते ती 64 रंगांची अॅम्बियंट लाईटिंग सिस्टम. 10 वेगवेगळ्या थीम्ससह ही लाईटिंग डॅशबोर्ड, डोअर ट्रिम्स आणि फुटवेलमध्ये सुरेख प्रकाश देते. Static आणि Dynamic लाईट मोड तसेच वेगवेगळे डिमिंग झोन्स असल्यामुळे केबिनचा मूड सहज बदलता येतो.

Nashik News: ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वतादरम्यानचा प्रवास सुस्साट होणार, ३ तासांचे अंतर ११ मिनिटांत पार!

advertisement

गाडीत MBUX Multimedia System High देण्यात आले आहे. 12.3-इंच टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. Hey Mercedes व्हॉईस कमांडद्वारे नेव्हिगेशन, मीडिया आणि क्लायमेट कंट्रोल सहज वापरता येतात. फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीमुळे ड्रायव्हरचे वैयक्तिक प्रोफाइल आपोआप लोड होते. सीट, मिरर, लाईटिंग आणि मीडिया सेटिंग्स ड्रायव्हरनुसार अॅडजस्ट होतात.

सेंटर कन्सोलवर एर्गोनॉमिक टचपॅड असून प्रत्येक टचला हॅप्टिक फीडबॅक मिळतो. मल्टी-फंक्शन लेदर स्टीअरिंग व्हीलवर टच कंट्रोल पॅनल्स आहेत, ज्यामुळे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मीडिया सिस्टम थेट स्टीअरिंगवरून नियंत्रित करता येतात. काही व्हेरिएंटमध्ये हिटेड स्टीअरिंगचाही पर्याय आहे.

advertisement

ओपन-पोर वूड-लूक ट्रिम, सॉफ्ट-टच मटेरियल आणि प्रीमियम लेदर सीटिंगमुळे केबिन अधिक एलिगंट वाटते. डोअर सिल्लवर इल्युमिनेटेड लेटरिंग आणि जमिनीवर प्रोजेक्ट होणारा Mercedes चा तीन-पॉइंटेड स्टार वेलकम इफेक्ट गाडीला खास बनवतो.

एक्सेरियर

बाहेरून पाहिल्यास V-Class अधिक स्पोर्टी आणि भव्य दिसते. AMG Line स्टायलिंगमुळे समोर मोठी ग्रिल आणि आकर्षक LED हेडलाइट्स देण्यात आले आहेत. गाडीची लांबी सुमारे 5.3 मीटर असून लांब व्हीलबेसमुळे रस्त्यावर मजबूत उपस्थिती जाणवते.

advertisement

इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे प्रवाशांसाठी सोयीचे आहेत. मागील बाजूस इलेक्ट्रिक टेलगेट आणि स्वतंत्र उघडणारी काच देण्यात आली आहे, ज्यामुळे रोजच्या वापरात सोय होते.

लांब व्हीलबेसमुळे केबिनमध्ये भरपूर लेगस्पेस आणि हेडरूम मिळते. मागील सीट्स फोल्ड केल्यास मोठ्या प्रमाणात बूट स्पेस उपलब्ध होते. त्यामुळे एअरपोर्ट पिकअप, लांब ट्रिप किंवा कौटुंबिक प्रवासासाठी ही गाडी उपयुक्त ठरते. मोठ्या सूटकेसेस सहज ठेवता येतात.

advertisement

प्रकार आणि इंजिन पर्याय

ही गाडी 4-सीटर आणि 6-सीटर अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. 4-सीटर व्हर्जनमध्ये मागे दोन मोठ्या कॅप्टन सीट्स आहेत, ज्यामध्ये मसाज, हीटिंग आणि कूलिंग सुविधा दिल्या आहेत. 6-सीटर मॉडेलमध्ये मधल्या सीट्स फिरवता येतात, त्यामुळे समोरासमोर बसून चर्चा करता येते. इंजिन पर्यायांमध्ये 2.0-लिटर डिझेल (सुमारे 237hp) आणि 2.0-लिटर पेट्रोल (सुमारे 231hp, माइल्ड-हायब्रिडसह) उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. Airmatic एअर सस्पेन्शनमुळे प्रवास अधिक मऊ आणि आरामदायी होतो.

किंमत प्रकार आणि इंजिन पर्याय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Toyota ला थेट भिडणार, Mercedes ची आली V-Class 6-सीटर, किंमत किती? Video
सर्व पहा

नवीन Mercedes-Benz V-Class 2026 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.4 कोटी ठेवण्यात आली आहे. ही गाडी 4-सीटर आणि 6-सीटर अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. 4-सीटर व्हर्जनमध्ये मागे दोन मोठ्या कॅप्टन सीट्स आहेत, ज्यामध्ये मसाज, हीटिंग आणि कूलिंग सुविधा दिल्या आहेत. 6-सीटर मॉडेलमध्ये मधल्या सीट्स फिरवता येतात, त्यामुळे समोरासमोर बसून चर्चा करता येते. इंजिन पर्यायांमध्ये 2.0-लिटर डिझेल (सुमारे 237hp) आणि 2.0-लिटर पेट्रोल (सुमारे 231hp, माइल्ड-हायब्रिडसह) उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. Airmatic एअर सस्पेन्शनमुळे प्रवास अधिक मऊ आणि आरामदायी होतो.

मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ला थेट भिडणार, Mercedes ची आली V-Class 6-सीटर, किंमत किती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल