ओलाने आपल्या 'राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म' अंतर्गत दिल्ली आणि हैदराबादमध्ये ई-बाइक सर्व्हिसचं अनावरण केलंय. कंपनीने म्हटलं की, जर हा प्रोजेक्ट यशस्वी ठरला तर ई-बाइकचा मोठा विस्तार केला जाईल. ओला ई बाइक सर्व्हिसची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचं भाडं कमी आहे. पेट्रोल बाइकने ट्रॅव्हल केल्याने लोकांना ई-बाइक आणखीच परवडेल. कारण यामध्ये बराच पैसा वाचेल.
advertisement
लवकरच लॉन्च होणार ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची पहिली CNG कार! मिळेल 5-स्टारची सेफ्टी; बुकिंग सुरु
बाइकपेक्षा स्वस्त असेल प्रवास
दिल्ली आणि हैदराबादमध्ये ओला ई-बाईक सर्व्हिसचं भाडं खूप कमी ठेवण्यात आलंय. पहिले 5 किलोमीटरसाठी 25 रुपये, 10 किलोमीटरसाठी 50 रुपये आणि 15 किलोमीटरसाठी 75 रुपये आहे. भाडं कॅलक्यूलेट केलं तर ते 5 रुपये प्रति किलोमीटर पडेल. ओलाने म्हटलंय की, ई-बाइक सर्व्हिस शहरांच्या आत ट्रान्सपोर्टेशनसाठी सर्वात परवडणारी, टिकाऊ आणि सुविधाजनक सेवा असेल.
कंपनीची योजना पुढील 2 महिन्यात दिल्ली आणि हैदराबादमध्ये 10 हजार ई-बाइक तैनात करण्याची आहे. ओला मोबिलिटीचे सीईओ हेमंत बख्शी यांनी म्हटलं की, 'ओलाची ही सर्व्हिस इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून 1 अब्ज भारतीयांची सेवा करण्याच्या आमच्या दृष्टिकोणाशी योग्य आहे.'
Budget Car : कुटुंबासाठी 7 सीटर कार घ्यायचीय? 'हे' आहेत बजेट फ्रेंडली आणि बेस्ट पर्याय
ओलाची ही ई-बाइक सर्व्हिस, पेट्रोल बाइक, ऑटो आणि कारच्या तुलनेत खूप स्वस्त ठरु शकते. कंपनी म्हणते की, जर त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर ते ई-बाइकचा ताफाही वाढवतील. यासोबतच देशातील इतर शहरांमध्ये देखील ही सर्व्हिस सुरु केली जाऊ शकते.