TRENDING:

Tesla आता विसरा! Tata लाँच करतेय land rover चा टच असलेली SUV, रेंज ऐकून कराल बूक

Last Updated:

आता या गाडीचं ईव्ही व्हर्जन लाँच करत आहे. टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये सहावी ऑल-इलेक्ट्रिक मॉडल असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
टाटा मोटर्स ही भारतातील मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. मागील काही वर्षांपासून टाटाने एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक वाहनं लाँच करून मार्केटमध्ये आघाडी घेतली आहे. अशातच आता टाटा Harrier EV लाँच करणार आहे. याआधी टाटाने Harrier ही पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये लाँच केली होती. आता या गाडीचं ईव्ही व्हर्जन लाँच करत आहे. टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये सहावी ऑल-इलेक्ट्रिक मॉडल असणार आहे.
News18
News18
advertisement

या वर्षीच टाटा मोटर्सने दिल्लीत झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये Tata Harrier EV झलक दाखवली होती. आता  Tata Harrier EV  3 जून रोजी शोरूममध्ये दाखल होईल.  गेल्या काही महिन्यांत,Harrier EV ची अनेक वेळा चाचणी करताना दिसली आहे. बाजारात लाँच होण्यापूर्वी, Harrier EV  ही ईव्ही जेन २ इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरवर तयार केली आहे.

advertisement

नवीन काय असेल?

Harrier EV ही एका नव्या उद्देशाने बनवलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैशिष्ट्यपूर्ण बॉडी-रंगीत, क्लोज फ्रंट ग्रिल आहे. या डिझाइनमध्ये सिग्नेचर स्प्लिट हेडलाइट लेआउट आणि एलईडी सीक्वेन्सियल इंडिकेटर आहेत. डीआरएल सिल्व्हरच्या रंगाच्या ग्रिलला जोडलेले आहेत, नव्याने  डिझाइन केलेले बंपर, अपडेटेड स्किड प्लेट्स आणि नवीन अलॉय व्हील्सने दिले आहे. चार्जिंग पोर्ट गाडीच्या उजव्या बाजूला आहे.

advertisement

लँड रोव्हरच्या मदतीने Harrier EV ची चेसी तयार 

दरम्यान, Harrier EV ही सेम आधीच्या Harrierवर तयार केली आहे. या ईव्हीमध्ये डीआरएल आणि हेडलॅम्प हे इंटरनल कम्बशन इंजिन (आयसीई) व्हेरियंटसारखेच आहे. Harrier EV Active.ev+ आर्किटेक्चरवर तयार केलेली आहे आणि  क्वाड-व्हील-ड्राइव्ह (QWD) ड्युअल-मोटर सेटअप आणि प्रीमियम असे फिचर्स दिले आहे. लँड रोव्हर D8-आधारित ओमेगा प्लॅटफॉर्मवरून घेतलेल्या मोनोकोक चेसिसवर बनवलेली आणि जग्वार लँड रोव्हरच्या सहकार्याने तयार केली आहे.

advertisement

500 किमी रेंज

Harrier EV मध्ये पॉवर आणि कार्यक्षमता दोन्ही लक्षात घेऊन डिझाइन केलेलं आहे. हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल-मोटर सेटअप आहे जे क्वाड-व्हील-ड्राइव्ह देते आणि 500Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही एकदा चार्ज केल्यावर सुमारे ५०० किमी इतकी रिअल ड्रायव्हिंग रेंज देते. ही कार मुळात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे.

advertisement

किंमत किती असणार? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

ही एसयूव्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट असा ऑप्शन असणार आहे. मार्केटमध्ये सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासाठी एमजी मोटर्सने विंडसर प्रो ईव्ही लाँच केली आहे. तर हुंदई आणि महिंद्रानेही आधीच आपल्या एसयूव्ही लाँच केल्या आहेत. त्यामुळे टाटाची हॅरिअर ही चांगलीच टक्कर देईल. टाटा हॅरियरच्या इलेक्ट्रिक कारची किंमत अंदाजे सुमारे 30 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Tesla आता विसरा! Tata लाँच करतेय land rover चा टच असलेली SUV, रेंज ऐकून कराल बूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल