अशी असेल नवी Tata Punch
नवीन अवतारामध्ये येणाऱ्या Tata Punch Facelift मध्ये बरेच छोटे मोठे बदल करण्यात आले आहे. नव्या Tata Punch Facelift चा लूक हा ईलेक्ट्रिक Tata Punch ची कॉपी असण्याची चिन्ह आहे. पण, बाहेरील रुपामध्ये स्प्लिट हेडलाईट सेटअप, नवीन डिझाइनचे एलईडी डे-टाईम रनिंग लाईट्स (DRLs), हॉरिझॉन्टल स्लॅट्ससह एक फ्रेश फ्रंट ग्रील आणि नवीन बंपर दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच Tata Punch Facelift मध्ये 16-इंचाचे अलॉय व्हील्स देखील दिले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
Tata Punch Facelift च्या इंटिरियरबद्दल बोलायचं झालं तर आताच्या Tata Punch पेक्षा बरेच बदल असणार आहे. केबिनला हायटेक लूक दिला जाणार असून नवीन फिचर्स दिले जातील. तसंच, 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा दिला जाईल. Tata Punch Facelift मध्ये 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरसारखे फिचर्सही असतील. सुरक्षेसाठी Tata Punch Facelift मध्ये ६ एअरबॅग्ज देखील स्टँडर्ड दिले जाातील.
Tata Punch Facelift च्या इंजिनमध्ये कोणतीही बदल केले जाणार नाही. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये देखील सध्याच्या Tata Punch मध्ये असलेलं1.2-लीटरचा रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनच दिलं जाणार आहे. हे इंजिन 87.8 PS पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशनच्या पर्यायांमध्येही कोणताही बदल होणार नाही, आणि ते पूर्वीप्रमाणेच 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी (AMT - ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असेल.
Tata Punch Facelift ची टक्कर कुणाशी?
Tata Punch सध्या मार्केटमध्ये मध्यमवर्गीयांची फेव्हरेट आहे. आता Tata Punch Facelift मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी Hyundai Exter आणि Maruti Ignis सारख्या कार्सशी स्पर्धा करेल. तसंच, Nissan Magnite आणि Renault Kiger सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीलाही टक्कर देईल.
