इलेक्ट्रिक कार सध्या तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतात. कारण त्या चालवण्याचा खर्च कमी आहे. आम्ही तुम्हाला टाटा टियागो ईव्हीच्या फायनान्स प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जी ऑफिसला जाण्यासाठी चांगली कार ठरू शकते.
दिल्लीमध्ये तुम्हाला कार किती ईएमआयवर मिळेल?
तुम्ही दिल्लीमध्ये टाटा टियागो ईव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर तुम्हाला आरटीओ फी आणि विमा रकमेसह सुमारे 8.44 लाख रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही Tiago EV खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा केले तर उर्वरित रकमेसाठी तुम्हाला बँकेकडून 5.44 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
advertisement
Royal Enfield: आता थाटात घेऊन या घरी बुलेट, किंमत इतकी होणार कमी!
यासोबतच, तुम्हाला ही रक्कम 7 वर्षांसाठी 8 टक्के व्याजदराने मिळाली तर तुम्हाला सुमारे 8 हजार रुपये EMI भरावे लागतील. जर तुम्ही 7 वर्षांसाठी कार कर्ज घेतले तर तुम्हाला सुमारे 1 लाख 68 हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.
Yamaha ची सुपर Bike झाली स्वस्त, 17 हजार रुपयांनी किंमत झाली कमी, संपूर्ण यादी
Tata Tiago EV ची पॉवर आणि रेंज
Tata Tiago EV दोन व्हेरिएंटमध्ये येते. त्याच्या बेस मॉडेलला पूर्ण चार्जवर 250 kmची रेंज मिळते. तर टॉप व्हेरियंटमध्ये ही रेंज 315 kmपर्यंत जाते. Tiago EV च्या टॉप व्हेरियंटमध्ये 24kWh बॅटरी मिळते. ही EV DC 25kW फास्ट चार्जर वापरून 58 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज करता येते. तर नियमित 15Amp होम चार्जर वापरून पूर्ण चार्ज करण्यासाठी 15 ते 18 तास लागतात.