Yamaha ची सुपर Bike झाली स्वस्त, 17 हजार रुपयांनी किंमत झाली कमी, संपूर्ण यादी
- Published by:Sachin S
Last Updated:
इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने कंपनी ग्राहकांसाठी दुचाकीवर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी दर कपातीचे संपूर्ण यादी
मुंबई: केंद्र सरकारने जीएसटीच्या कर रचनेत बदल केला आहे. आता २८ टक्के कर स्लॅब हा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रामध्ये झाला आहे. सर्वात जास्त परिणाम हा ऑटो इंडस्ट्रीमध्ये दिसून येतोय. सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या दरात कपात केली आहे. अशातच आता यामाहा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किंमतीत कपात केली आहे. सध्या मार्केटमध्ये असलेल्या बाईकच्या किंमतीत किती कपात झाली, याची यादी जाहीर केली आहे.
इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने कंपनी ग्राहकांसाठी दुचाकीवर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी दर कपातीचे संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. हे सुधारित दर जाहीर केल्याप्रमाणे २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
''आम्ही दुचाकीवरील जीएसटीमध्ये वेळेवर कपात करण्यासाठी भारत सरकारचे आभार व्यक्त करतो. हा पुढाकारामुळे सणासुदीच्या काळात दुचाकीसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. दुचाकी अधिक किफायतशीर केल्याने प्रत्यक्ष ग्राहकांना फायदा होईल, तसेच एकूण वापर वाढेल आणि उद्योगाला सकारात्मक गती मिळेल. यामाहामध्ये आम्हाला संपूर्ण भारतातील ग्राहकांना या कपातीचे संपूर्ण फायदे देण्याचा आनंद होत आहे.'' असं मत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इतारू ओटणी यांनी केलं.
advertisement
तसंच, यामाहाच्या दुचाकी पोर्टफोलिओमध्ये २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या जीएसटी दराच्या कपातीनंतर बाईकच्या किंमती किती असेल याची यादी जाहीर केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. हे सर्व दर एक्स शोरूम नवी दिल्ली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हे दर वेगवेगळे असू शकतात.
Models | जुनी किंमत | नवी किंमत | GST मुळे किती फायदा |
R15 | 2,12,020 | 1,94,439 | 17,581 |
MT15 | 1,80,500 | 1,65,536 | 14,964 |
FZ-S Fi Hybrid | 1,45,190 | 1,33,159 | 12,031 |
FZ-X Hybrid | 1,49,990 | 1,37,560 | 12,430 |
Aerox 155 Version S | 1,53,890 | 1,41,137 | 12,753 |
RayZR | 93,760 | 86,001 | 7,759 |
Fascino | 1,02,790 | 94,281 | 8,509 |
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 7:14 PM IST