परवडणारी किंमत आणि दमदार इंजीन
किंमतीविषयी बोलायचं झाल्यास, Xpres पेट्रोलची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत ₹5.59 लाख ठेवण्यात आली आहे. तर याच्या सीएनजी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹6.59 लाख आहे. दोन्ही मॉडल्समध्ये टाटाचा विश्वासार्ह 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजीनचा वापर करण्यात आला आहे. जो 86 hp ची पॉवर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे विशेषतः व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेले आहे जेणेकरून फ्लीट मालकांना कमी ऑपरेटिंग खर्च आणि अधिक टिकाऊपणा मिळेल.
advertisement
'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Automatic Car, किंमत फक्त 4.75 लाखांपासून सुरु
ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान आणि सुधारित स्पेस
या नवीन मालिकेत टाटाने त्यांच्या प्रसिद्ध "ट्विन-सिलेंडर" तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एका मोठ्या सिलेंडरऐवजी, दोन लहान सिलेंडर बसवण्यात आले आहेत. ज्यांची एकूण क्षमता 70 लिटर (पाण्याची क्षमता) आहे. या सेटअपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते ट्रंकमध्ये सामान ठेवण्यासाठी (बूट स्पेस) पुरेशी जागा प्रदान करते, जी बहुतेकदा सिंगल-सिलेंडर सीएनजी कारमध्ये नसते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 419 लिटरची मोठी बूट स्पेस मिळते.
इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये बदल
इलेक्ट्रिक मॉडेलच्या विपरीत, पेट्रोल आणि सीएनजी एक्सप्रेसचे केबिन 'ड्युअल-टोन' थीममध्ये पूर्ण केले आहे. तसंच, खर्च कमी ठेवण्यासाठी, ते ऑडिओ सिस्टमसह येत नाही. बाहेरून, त्यात 14-इंच स्टील व्हील आहेत, जे चांदीऐवजी काळ्या व्हील कव्हरने सजवलेले आहेत. फ्लीट ऑपरेटर्सच्या व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन हे डिझाइन आणि फीचर्स विकसित करण्यात आली आहेत.
Renault Duster: 'ती' आली तिने पाहिलं आणि जिंकलं! अखेर धाकड SUV परतली, लूक पाहून पडाल प्रेमात
वॉरंटी आणि सर्व्हिस
टाटा मोटर्स फ्लीट मालकांना आकर्षित करण्यासाठी कारवर 3 वर्षे किंवा 1,00,000 किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे. जी 5 वर्षे किंवा 1,80,000 किलोमीटरपर्यंत वाढवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनीने निवडक शहरांमध्ये विशेषरित्या 'फ्लीट-ओनली डीलरशिप आणि सर्व्हिस सेंटर स्थापित केले आहेत. लवचिक फायने्स पर्यायांसह, टाटाचं लक्ष्य त्या ऑपरेटर्सपर्यंत पोहोचणे आहे, जे अजुनही चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक ऐवजी पारंपारिक इंधनाला प्राथमिकता देतात'
