मनिषा सिंह ही बिहारच्या आरा येथील नथमलपुर गावातील रहिवासी आहे. तिचे वडील अरविंद कुमार सिंह भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत होते. मनीषा सिंह हिची भारतीय हवाई दलातील फ्लाइंग ऑफिसर या पदावर निवड झाली आहे. तिने संपूर्ण भारतात एएफकॅटच्या परिक्षात 18 वी रँक मिळवली आहे. तसेच सैन्यदलातील सीडीएसमध्ये चौथी रँक मिळवली आहे.
advertisement
5 लाखांचं घेतलं लोन, सुरू केला हा व्यवसाय, आज दिवसाला होतेय लाखभर कमाई, या बिर्याणीला तोडंच नाही
दररोज 10 ते 12 तास अभ्यास -
तीन भाऊ बहिणींमध्ये मनिषा सिंह सर्वात मोठी आहे. येत्या 1 जुलै रोजी हैदराबाद येथे तिची ज्वाइनिंग होणार आहे. लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, तिचे वडील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांना पाहूनच ती मोठी झाली आहे. त्यांचा गणवेश, त्यांची ड्यूटी आणि सैन्यदलाचे वातावरण पाहून बालपणापासूनच मनात सैन्यदलात जायचे स्वप्न होते. त्यामुळे मॅट्रिकच्या शिक्षणानंतर आर्मी स्कूलमधून तिने बारावीचे शिक्षण घेतले. यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर सैन्यदलात अधिकारी होण्याच्या इच्छेने दिल्लीत एसएसबीचे कोचिंग घेतले. लेखी परिक्षेची तयारी करण्यासाठी तिने तब्बल 10 ते 12 तास दररोज अभ्यास केला.
दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर
यानंतर लेखी परीक्षा पास झाल्यावर 5 दिवसांनी एसएसबीची परीक्षा झाली. पहिल्याच प्रयत्नात सीडीएस परिक्षेत तिने देशात 4 थी रँक मिळवली. तसेच एएफकॅट परिक्षेत देशात 18 वी रँक मिळवली. तिच्याकडे भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट आणि भारतीय हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर अशा दोन पदांची संधी आहे. यामध्ये तिने भारतीय हवाईदलात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाली मनिषा -
मनिषाने सांगितले की, डिफेन्स विभाग हा कोणताही भेदभाव करत नाही. त्यामुळे पुरुष असो की महिला दोन्ही देशाचे सैनिक बनू शकतात आणि देशाची सेवा करू शकतात. याच कारणामुळे मी भारतीय हवाई दलाची निवड केली. बालपणापासून भारतीय हवाई दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते, असेही ती म्हणाली.
वडिलांनी व्यक्त केल्या या भावना -
तर तिचे वडील अरविंद सिंह यांनी सांगितले की, आज माझ्या मुलीमुळे मला गाव, शहर आणि सर्वत्र ओळखले जात आहे, एका बापासाठी याहून मोठे काय असू शकते. जेव्हापासून मनिषाचा निकाल लागला आहे, तेव्हापासून लोकं म्हणतात की, हे मनिषाचे वडील आहेत. मी मुलगा आणि मुलीत कोणताही भेदभाव केला नाही. माझ्याजवळ माझी मुलांचे शिक्षण आणि संस्कार हीच माझी संपत्ती आहे. माझ्याजवळ मनिषासारखी मुलगी आहे, याचा मला खूप अभिमान वाटत आहे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.