5 लाखांचं घेतलं लोन, सुरू केला हा व्यवसाय, आज दिवसाला होतेय लाखभर कमाई, या बिर्याणीला तोडंच नाही
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
2007 मध्ये 5 लाखाचं लोन घेऊन शाहू स्टेडियम येथे एका गाळ्यात दादा'ज बिर्याणी या छोट्या हॉटेलची सुरुवात झाली. सुरुवातीला दोन्ही भाऊ, त्यांची आई आणि एक आचारी असे मिळून या दादा'ज बिर्याणीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चिकन बिर्याणी ही एक लोकप्रिय डिश आहे. चिकन बिर्याणी तर अनेकांनी अनेकदा खाल्ली आहे. परंतु दादा'ज बिर्याणीची गोष्टच निराळी आहे. जे लोक बिर्याणीचे शौकीन आहेत, त्यांनी साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये जाऊन दादा'ज बिर्याणीची आवर्जून चाखावी. दादा'ज बिर्याणी आता साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. यासोबतच ही बिर्याणी बनवणारे दोन भाऊदेखील तेवढेच प्रसिद्ध झाले आहेत.
advertisement
2007 मध्ये 5 लाखाचं लोन घेऊन शाहू स्टेडियम येथे एका गाळ्यात दादा'ज बिर्याणी या छोट्या हॉटेलची सुरुवात झाली. सुरुवातीला दोन्ही भाऊ, त्यांची आई आणि एक आचारी असे मिळून या दादा'ज बिर्याणीची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशांत फडतरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत फडतरे असे या दोन भावांचे नाव आहे. त्यांनी खूप कष्टातून, प्रामाणिकपणे हा व्यवसाय सुरू केला. त्यांनी स्वत: ग्राहकांना बिर्याणी देणे, डिश उचलणे, खरकटे पुसणे, बिर्याणी तयार करताना मदत करणे, अशी सर्व कामे आपल्या हॉटेलवर केली.
advertisement
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
दोन्ही भावांनी घेतली मोठी भरारी -
दोन्ही भावांनी सुरुवातीला 5 लाख रुपयांचे लोन घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या मेहनतीने तसेच ग्राहकांच्या प्रेमाने हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला. आज सातारकर मोठ्या प्रमाणावर बिर्याणीची चव चाखण्यासाठी येथे येतात. दोन्ही बंधूंच्या कष्टाला यश मिळू लागलं आहे. या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी त्यावर तोडगा काढत आपला व्यवसाय अगदी कष्टाने, प्रामाणिकपणे सुरू ठेवला.
advertisement
वाढती ग्राहकांची संख्या पाहून हॉटेल कमी पडू लागले. त्यामुळे 1 गाळ्याचे 2 गाळे झाले. नंतर 2 चे 4 झाले, 4 चे 8 झाले आणि आता तब्बल शाहू स्टेडियममध्ये दादा'ज बिर्याणी हाऊस हे प्रशस्त अशा 10 गाळ्यामध्ये विस्तारले आहे. दोन मराठी भावांनी 5 लाख रुपये लोन घेऊन एका गाळ्यापासून ते आज 10 गाळ्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आज ते लाख ते सव्वा लाख रुपये कमवत आहेत. सुरुवातीच्या काळात याठिकाणी चार लोक काम करत होते. पण आता येथे 40 लोक काम करतात.
advertisement
तब्बल 45 प्रकारच्या डिश उपलब्ध -
या बिर्याणीसाठी उच्च प्रतीचा तांदूळ वापरला जातो. चिकनचे पीस मोठे आणि स्वच्छ असतात. बिर्याणीसाठी गरम मसाला जास्त प्रमाणात वापरला जात नाही. त्यासाठी लागणारे तेल त्याचबरोबर इतर सामग्री या उच्च प्रतीच्या वापरल्या जातात. येथील बिर्याणीसोबतच इतर डिशसुद्धा खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये तंदूर 65, बटर चिकन, मटन थाळी, चिकन थाळी, व्हेज डिशेस, स्टार्टर्स साठी मासे, मसाले पापड, मटन बिर्याणी, दालच्या बिर्याणी, लेग पीस यांचा समावेश आहे.
advertisement
याठिकाणी रोज 50 ते 70 किलोची बिर्याणीची विक्री होते. या बिर्याणीची किंमत120 रुपये हाफ तर फुल बिर्याणीची किंमत 180 रुपये आहे. आज त्यांनी आपल्या या व्यवसायाला ब्रँड बनवले आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक याठिकाणी जेवायला येतात.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
June 26, 2024 3:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
5 लाखांचं घेतलं लोन, सुरू केला हा व्यवसाय, आज दिवसाला होतेय लाखभर कमाई, या बिर्याणीला तोडंच नाही

