दिल्ली : दिल्ली देशाची राजधानी आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. रेडलाईट सारख्या परिसरात काही जण भीक मागून आपले घर चालवतात आणि मुलांचे संगोपन करतो. अनेकांची पोरं हेच काम पाहत मोठी होतात आणि मोठी झाल्यावरही हेच काम करतात.
पण या सर्व परिस्थितीत एक संस्था अशी आहे, जिने रस्त्यावरील मुलांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. रस्त्यावरील मुलांना या संस्थेच्या माध्यमातून कशी मदत केली जाते, याबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
advertisement
या फाऊंडेशनचे नाव बेटी फाऊंडेशन असे आहे. याठिकाणी बेटीची पाठशाळा या नावाने एक मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत गरीब, असहाय आणि रस्त्यावरील मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. दिल्लीतील आयआयटी फ्लायओव्हरच्या लाल दिव्याजवळ या मुलीची शाळा सुरू आहे.
या संदर्भात लोकल 18 च्या टीमने या एनजीओच्या सदस्या रुची बोहरा यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितले की, 2019 पासून ही एनजीओ कार्य करत आहे. या एनजीओची सुरुवात अनुज भाटी यांनी केली होती. दिल्ली आयआयटी फ्लायओव्हरच्या लाल दिव्याजवळ दररोज रस्त्यावरील मुले, जी भीक मागतात. ज्या सर्व मुलांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. अशी मुले इथे शिकायला येतात. बेटीची पाठशाळा या ठिकाणी मंगळवार आणि रविवार वगळता आठवड्यातून पाचही दिवस मुलांना शिकवले जाते. या शाळेची वेळ 3 ते 5 वाजेपर्यंत आहे.
शिक्षणासोबत जेवणही दिले जाते -
त्यांनी पुढे सांगितले की, याठिकाणी मुलांना शिक्षणासोबत जेवणही दिले जाते. याठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 4 शिक्षक या मुलांना शिकवतात. या शिक्षकांना बेसिक सॅलरी दिली जाते. तसेच या गरीब मुलांना शिक्षणाला मदत व्हावी म्हणून अनेक स्वयंसेवकही यांच्यासोबत जोडले गेले आहेत.
एकूण किती मुले शिकतात -
रुची यांनी सांगितले की, दररोज रस्त्याच्या बाजूला जवळपास 40 ते 50 मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हा उद्देश्य आहेत. जर कुणाला त्यांच्यासोबत काम करायचे असेल तर त्यांनी आयआयटी फ्लायओव्हरच्या लाल दिव्याजवळ येऊन त्यांच्या या बेटीची पाठशाळेशी संपर्क साधू शकतात, असे आवाहन त्यांनी केले आहे.