डेहराडून : भारताला अनेक महान महिलांचा वारसा लाभला आहे. इंदिरा गांधी ते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सानिया नेहवाल, सानिया मिर्झा, तसेच पीव्ही सिंधू, पोलीस प्रशासनामध्ये किरण बेदी, मीरा बोरवणकर यांसारख्या अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करत देशातील अनेकांना प्रेरणा दिली आहे. यातच आपण एका अशा वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकाऱ्याबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा प्रवास हा खूपच प्रेरणा देणार आहे.
advertisement
उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव एस एस संधू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता 1988 बॅचच्या आयएएस अधिकारी राधा रतूडी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 31 जानेवारी रोजी त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्विकारला. उत्तराखंड राज्यापासून वेगळे झाल्यानंतर आता उत्तराखंड राज्याला राधा रतूडी यांच्या रुपाने पहिल्या महिला मुख्य सचिव मिळाल्या आहेत.
यानिमित्ताने सरकारने राज्यात महिला सशक्तीकरणाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राधा रतूडी या उत्तराखंड राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावरील पहिल्या महिला बनल्या आहेत. पण यासोबतच नवनियुक्त मुख्य सचिव राधा रतुरी यांचा कार्यकाळ फारच कमी असणार आहे. याच वर्षी 31 मार्च रोजी त्या निवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ वाढवायचा की नाही, याचा निर्णयही सरकारवर अवलंबून आहे.
कोण आहेत राधा रतूडी -
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राधा रतूडी या आपल्या 36 वर्षांच्या कार्यकाळात उत्तराखंड राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिल्या आहेत. त्यांनी डेहराडूनच्या जिल्हाधिकारी, राज्य मुख्य निर्वाचन अधिकारी व अपर मुख्य सचिव महिला सशक्तिकरण म्हणून अनेक महत्त्वाच्या पदांवर आपली सेवा बजावली आहे. याआधी 1973 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य 2004 मध्ये राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी बनल्या होत्या.
मुंबईतून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर -
उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकारी राधा रतुडी यांनी पत्रकारितेपासून आपले करिअर सुरू केले होते. 1985 मध्ये मुंबईतून मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेतले आणि यानंतर इंडियन एक्सप्रेस मुंबई आणि त्यानंतर इंडिया टुडे मासिकातही काम केले. यादरम्यान त्यांनी नागरी सेवांचीही तयारी सुरू केली.
मध्य प्रदेश की बेटी बनी उत्तराखंड की बहू
राधा रतूडी यांची 1988 मध्ये निवड झाल्यावर प्रशिक्षणासाठी त्या हैदराबादला गेली, जिथे त्यांची भेट 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अनिल रतूडी यांच्याशी झाली. या दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि अशा प्रकारे दोघांनी लग्न केले. अनिल रतूडी हे उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहेत. अशाप्रकारे मध्य प्रदेशात जन्मलेल्या राधा रतूडी या उत्तराखंडच्या सून झाल्या. ही योगायोगाची गोष्ट आहे की, पती-पत्नी दोघांनीही उत्तराखंडमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर आपापल्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे पती आयपीएस अधिकारी अनिल रतूडी हे उत्तराखंड पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले आहेत.
