परराष्ट्र मंत्रालय भरती 2024 च्या अधिकृत पत्रानुसार ज्या उमेदवारांची निवड या पदासाठी होईल अशा उमेदवारांना प्रतिवर्ष 8.40 लाख रुपये पगार दिला जाईल. जे उमेदवार पदासाठी दिलेले नियम पूर्ण करतील अशांनी अर्जाचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. किंवा उमेदवार aopfsec@mea.gov.in ईमेलवर देखील त्यांचा अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे.
advertisement
परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करण्यासाठी पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुरातत्व किंवा संवर्धन किंवा संग्रहालयात पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर, पदव्युत्तर डिप्लोमा किंवा त्याहून अधिक सिव्हिल/स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे वारसा विकास प्रकल्प जसे उत्खनन, पुनर्स्थापन आणि संरक्षण, संग्रहालय विज्ञानच्या संबंधित कार्य, आइकनोग्राफी सर्वेक्षणमध्ये 10 वर्षांचा अनुभव असायला हवा. तुम्ही केलेल्या कामाचे पुरावे डिजाइनिंग, डीटीपी, सोशल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किती असावे?
परराष्ट्र मंत्रालयात भरती 2024 साठी दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे 35 ते 60 वर्ष इतकं असावं. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकानुसार सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. अंतिम मुलाखत उमेदवाराच्या परफॉर्मेंसच्या आधारे होईल. मुलाखतीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे टीए/डीए मिळणार नाही.
