छत्रपती संभाजीनगर : बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? हा अनेक विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध असणारं क्षेत्र निवडण्याकडेच सर्वांचा कल असतो. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे होम सायन्स होय. होम सायन्समधील विविध कोर्सला प्रवेश घेऊन नोकरी आणि व्यवसायाची सुवर्णसंधी मिळू शकते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्राची गिरी यांनी माहिती दिलीय.
advertisement
होम सायन्समध्ये विविध कोर्स
होम सायन्समध्ये अनेक कोर्सेस आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. होम सायन्स मध्ये 5 मुख्य शाखा आहेत. यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन, ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजेच मानव विकास, क्लोजिंग अँड टेक्सटाईल म्हणजेच वस्त्र शास्त्र, होम मॅनेजमेंट, एक्सटेन्शन एज्युकेशन अर्थात विस्तार शिक्षण या पाच शाखा यामध्ये आहेत. या पाचही शाखांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊन तुमचं करिअर करू शकता, असं सहाय्यक प्राध्यापक प्राची गिरी सांगतात.
Media मध्ये करियर करायचंय? बारावीनंतर 'या' कोर्सचा प्रचंड बोलबाला
पदवी आणि डिप्लोमाचा पर्याय
होम सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी पदवी आणि डिप्लोमा हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. पदवी 3 किंवा 4 वर्षांची आहे. तर डिप्लोमा एक वर्षांचा आहे. शासकीय महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यास अत्यंत कमी फीमध्ये शिक्षण पूर्ण करता येऊ शकतं. जर तुम्हाला होम सायन्समध्ये आवड असेल तर जवळच्या कुठल्याही शासकीय महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता आणि प्रवेश निश्चित करू शकता, अशी माहिती गिरी यांनी दिली.