Media मध्ये करियर करायचंय? बारावीनंतर 'या' कोर्सचा प्रचंड बोलबाला

Last Updated:

हा कोर्स केल्यानंतर मीडियामध्ये कोणतंही काम असो, मग ते कॅमेऱ्याच्या पडद्याआड असो किंवा पडद्यासमोर असो, ते विद्यार्थ्यांना करता येतं.

+
बारावीनंतर

बारावीनंतर मीडियाचं शिक्षण कसं घ्यावं?

प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : करियर म्हणजे काही ठराविक अभ्यासक्रम, ही विचारसरणी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड बदलली आहे. 2009 साली आलेल्या 3 इडियट्स या चित्रपटाचा यात मोलाचा वाटा आहे. त्यात आमिर खाननं म्हटलंय की, ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्रात करियर करायला हवं तरच यश मिळतं. हेच आता विद्यार्थी आणि पालकही फॉलो करू लागले आहेत. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर मीडिया क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढलीये. यातून अनेक पत्रकार, दिग्दर्शक, फोटोग्राफर, ऍडव्हटायझर्स, लेखक, साहित्यिक, व्हिडीओ जॉकी जन्माला येतात. हा कोर्स नेमका काय आहे, जाणून घेऊया. या क्षेत्रात करियर करण्यासाठी नेमका कोणता कोर्स निवडायला हवा याबाबत प्राध्यापक गजेंद्र देवडा यांनी माहिती दिली आहे.
advertisement
BAMMC अर्थात 'बॅचलर ऑफ आर्ट्स इन मल्टी मिडिया अँड मास कम्युनिकेशन' असं या कोर्सचं नाव आहे. तुम्ही बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झाला असाल तरी या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. तुम्हाला मुंबईत शिकायचं असेल तर त्यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊया.
advertisement
प्रवेश प्रक्रिया
विद्यापीठाच्या वेबसाइटवर ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजचा फॉर्म भरावा. शिवाय त्या कॉलेजचं Prospectors घेऊन रजिस्टर करावं. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यंदा 25 मे ते 10 जूनदरम्यान कालावधी दिलेला आहे. त्यानंतर 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट जारी होईल. त्यातून विद्यार्थ्यांना आवडीनुसार हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल.
advertisement
मुंबईत साठ्ये, रुईया, मिठीबाई, रुपारेल, सेंट झेवियर्स, नॅशनल अशा तब्बल 130 महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यापैकी 12 महाविद्यालये स्वायत्त म्हणजेच Autonomous आहेत.
BAMMC या अभ्यासक्रमाचं स्वरूप 3 वर्षांचं आहे. पूर्वी तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना जाहिरात आणि पत्रकारिता यापैकी एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडण्याची मुभा होती. आता मात्र नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20-21 नुसार त्यात बदल झाला असून स्वायत्त महाविद्यालयांनी Major आणि Minor विषय घेऊन जाहिरात आणि पत्रकारिता हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून इतर महाविद्यालयांमध्येसुद्धा याच पद्धतीने हा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे.
advertisement
स्कोप काय?
हा कोर्स केल्यानंतर मीडियामध्ये कोणतंही काम असो, मग ते कॅमेऱ्याच्या पडद्याआड असो किंवा पडद्यासमोर असो, ते विद्यार्थ्यांना करता येतं. शिवाय या कोर्समध्ये ज्यावरून संदेश आणि माहिती देशभरात किंवा जगभरात प्रसारित होते अशा सर्व मीडिया चॅनलचं परीक्षण केलं जातं. चित्रपट, रेडिओ स्टेशन, दूरदर्शन केंद्र, मासिकं, वर्तमानपत्र, इंटरनेट आणि इतर माध्यमांचा, वाहिन्यांचा अभ्यास केला जातो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करून विद्यार्थ्यांना आवडीनुसार जाहिरात किंवा पत्रकारिता क्षेत्रात नोकरीची चांगली संधी उपलब्ध होते.
मराठी बातम्या/करिअर/
Media मध्ये करियर करायचंय? बारावीनंतर 'या' कोर्सचा प्रचंड बोलबाला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement