शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं, 60 व्यावर्षी परीक्षा देत आजीने मिळवले दहावीत यश Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं असं आपण अनेक वेळा ऐकलं असेलच. पुण्यातील कमलाबाई जगताप यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत 38.80 टक्के गुण मिळवले आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे - शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं असं आपण अनेक वेळा ऐकलं असेलच. त्याचप्रमाणे पुण्यातील श्रीमती रमाबाई रानडे हायस्कुल सेवा सदन इथे शिकणाऱ्या कमलाबाई जगताप यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत 38.80 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांनी वयाच्या 52 व्यावर्षी पहिलीच शिक्षण घायला सुरुवात केली होती. यावर्षी परीक्षा देतं नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे.
advertisement
कोणत्या विषयाला मिळाले किती गुण?
कमलाबाई जगताप या पुण्यातील घोरपडी पेठ या भागात राहिला आहेत. त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली. त्या शाळेत दररोज जातं असतं. या सोबतच त्या घर काम देखील करतं. त्या दहावीची परीक्षा 38.80 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना मराठी विषयात 41 गुण, हिंदीमध्ये 41 गुण, इंग्रजीमध्ये 35, गणितामध्ये 35 गुण, सायन्स आणि टेकनॉलॉजीमध्ये 35, आणि सोशल सायन्समध्ये 42 गुण मिळाले आहेत.
advertisement
कसं मिळवलं यश?
या यशाबद्दल बोलताना कमलाबाई जगताप यांनी सांगितले की, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण का आणि किती महत्त्वाचं आहे. नोकरी असो किंवा कुठला व्यवसाय करायचा असो यासाठी शिक्षण हे लागतंच. त्यामुळेच मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच सर्व शिक्षण हे श्रीमती रमाबाई रानडे श्री हायस्कुल सेवा सदन या प्रौढ हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.
advertisement
'कुरिअर बॉय'च्या मुलाचं टॅलेंट! RTE तून मिळाला प्रवेश अन् दहावीत मिळवलं मोठं यश, Video
घरामध्ये मुलगा सून आणि नातं आहे. नातिला सांभाळून घर काम करून मी माझा अभ्यास करत होते. जिथे घर काम करत होते त्या लोकांना माहिती न होऊ देता मी अभ्यास करायचे. कारण त्याचा परिणाम माझ्या कामावर होऊ नये असं मला वाटायचं परंतु त्यांना जेव्हा सांगितलं की मी शिक्षण ही घेत आहे तेव्हा त्या लोकांनी मला पाठिंबा दिला. मला वाचायला, लिहायला यायला पाहिजे हा माझा शिक्षणाचा मूळ उद्देश होता. मला वाटलंच नाही की मी खरच परीक्षा पास होईल. आता पास झाल्यामुळे मला खरच खुप आनंद होत आहे, असं कमलाबाई जगताप यांनी सांगितलं.
advertisement
लातूरच्या शर्वरीला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण, पाहा काय आहे यशाचा मूलमंत्र?
शैक्षणिक वर्ष 2023-24 यामध्ये श्रीमती रमाबाई रानडे या प्रशाळेतून 13 विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या होत्या. सर्व विद्यार्थिनी या पास झाल्या आहेत. तर प्रथम आलेली मंजिरी मारणे हिला 70 टक्के गुण मिळालेले आहेत. 14 ते 60 वयाच्या पुढील विद्यार्थिनी इथे प्रवेश घेतात. त्यातीलच एक म्हणजे कमलाबाई जगताप या पहिली ते दहावी शाळेत शिकल्या आहेत. त्या घर काम करून शाळेत येत होत्या. अशा या परिस्थिती त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यांनी पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं तेव्हा त्यांचं वय 52 होतं तर आता त्या 60 वर्षाच्या आहेत, अशी माहिती श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ हायस्कुलच्या प्रभारी मुख्यधापिका निलम खोमणे यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 29, 2024 10:36 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं, 60 व्यावर्षी परीक्षा देत आजीने मिळवले दहावीत यश Video