लातूरच्या शर्वरीला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण, पाहा काय आहे यशाचा मूलमंत्र?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लातूर येथील विद्यार्थिनी शर्वरी विनायक तळणीकर हिला दहावी 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अपूर्वा तळणीकर,प्रतिनिधी
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल हा जास्त लागला आहे. यामध्ये लातूर येथील विद्यार्थिनी शर्वरी विनायक तळणीकर हिला दहावीला 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोण आहे शर्वरी?
शर्वरी विनायक तळणीकर ही लातूरची आहे. केशवराज माध्यमिक शाळामध्ये ती शिक्षण घेत होती. शर्वरीला दहावीमध्ये 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. शर्वरी ही दहावी सुरू झाल्यापासून दररोज सकाळी चार वाजता उठून अभ्यास करत होती. शर्वरीला मराठी विषयात 92 गुण, संस्कृतमध्ये 100 गुण, गणित 95 गुण, इंग्रजी 96 गुण, विज्ञान 99 गुण, सामाजिक शास्त्र विषयात 97 गुण आहेत. तर स्पोर्टचे 13 गुण मिळालेले आहेत.
advertisement
शर्वरी सांगितले की, तिला जो पण विषय अवघड जायचा त्यासाठी तिने तिच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं. गणित हा विषय अवघड जात होता तर तिने त्यासाठी विशेष तयारी केली होती. तिने गणिताच्या आधिच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या. त्यामधून तिला पेपर देण्यासाठी मदत झाली.
शर्वरीला विज्ञान हा विषय सोपा जायचा तर तिने त्याचा पण चांगला अभ्यास केला होता. तसेच तिच्या शाळेमध्ये सर्व विषयाची शिक्षकांनी तयारी करून घेतली होती. शर्वरीला भविष्यामध्ये मेडिकल फिल्डमध्ये जाऊन करिअर करायचे आहे. शर्वरीने 100 पैकी 100 गुण घेतले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात तिने तिला जे पण करायचं आहे त्यासाठी मी तिच्यासोबत आहे, असं शर्वरीचे वडील विनायक तळणीकर यांनी सांगितलं.
Location :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
May 27, 2024 5:00 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
लातूरच्या शर्वरीला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण, पाहा काय आहे यशाचा मूलमंत्र?