वडील सिक्युरिटी गार्ड असणाऱ्या शाळेत शिकली मुलगी, क्लास न लावता मिळाले 97.8 टक्के गुण
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
नागपूमधील सुहानी येळणे हिने 97.8 टक्के गुण मिळवत यश संपादन केलं आहे. ज्या विद्यालायामध्ये ती शिक्षण घेत होती त्याच विद्यालायात तिचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नागपूमधील सुहानी येळणे हिने 97.8 टक्के गुण मिळवत यश संपादन केलं आहे. ज्या विद्यालायामध्ये ती शिक्षण घेत होती त्याच विद्यालायात तिचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. तिने कोणत्याही क्लास न लावता हे यश संपादन केलं आहे.
advertisement
कसं मिळवलं यश?
सुहानी अल्केश येळणे ही सोमलावर निकलस विद्यालयात शिक्षण घेत होती. याच विद्यालयात तिचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून करतात. सुहानीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या पाठिंब्याला आणि मेहनतीला दिले आहे. सुहानीने सांगितले की, आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. या मुळेच हे गुण मिळाले आहेत.
advertisement
सुहानीला मराठी विषयात 92 गुण, इंग्रजी 94 गुण, संस्कृत 100 पैकी 100 गुण, गणित 98 गुण, समाजशास्त्र 98 गुण आणि विज्ञानमध्ये 99 गुण मिळाले आहेत. सुहानीचे सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न आहे आणि तिला या दिशेने आपले शिक्षण घ्यायचे आहे.
advertisement
माझ्या मुलीने चांगला अभ्यास केला आणि इतके चांगले गुण मिळवले याचा मला खूप आनंद आहे. तिने भविष्यातही असेच यश मिळवावे, असं वडील अल्केश येळणे यांनी सांगितलं.
कौतुकास्पद! 58 वर्षांची महिला झाली बारावी पास, पुण्यातल्या मावळमधील प्रेरणादायी कहाणी
मला खूप बरे वाटत आहे आणि मला सुहानीचा अभिमान आहे की तिने 97.8 टक्के गुण मिळवले आहेत. पहिल्या वर्गापासून ती पहिली आली आहे. तिने यापुढेही असंच यश मिळवावे, असं सुहानीची आई सुचिता यांनी सांगितलं.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 28, 2024 3:03 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
वडील सिक्युरिटी गार्ड असणाऱ्या शाळेत शिकली मुलगी, क्लास न लावता मिळाले 97.8 टक्के गुण