'कुरिअर बॉय'च्या मुलाचं टॅलेंट! RTE तून मिळाला प्रवेश अन् दहावीत मिळवलं मोठं यश, Video

Last Updated:

नागपूरच्या कुरिअर बॉयच्या मुलाने दहावीत 94.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवलंय. पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची सम्यकची इच्छा आहे.

+
सम्यक

सम्यक ने प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात काही मुलांनी लक्षवेधी यश मिळवलंय. यात नागपुरातील कुरिअर बॉयचा मुलगा सम्यक बेलेकर याचाही समावेश आहे. सेंटर प्रोविजनल शाळेचा विद्यार्थी असणाऱ्या सम्यकची घरची परिस्थिती बेताची आहे. आरटीईतून प्रवेश मिळाल्यानंतर त्याने खूप अभ्यास करून मोठं यश संपादित केलं. दहावीत त्याला 94.20 टक्के गुण मिळाले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
किती मिळाले गुण?
सम्यकला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालंय. त्याला मराठी विषयात 91 तर इंग्रजीमध्ये 94 गुण मिळाले आहेत. तसेच हिंदी विषयात 88, गणितात 97 तर समाजशास्त्रात 96 गुण मिळाले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातही त्याला 93 गुण मिळाले आहेत.
advertisement
आरटीईतून मिळाला प्रवेश
सम्यकचे वडील व्यवसायाने कुरिअर बॉय म्हणून काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सम्यकला RTE च्या माध्यमातून प्रवेश मिळाला. सम्यक लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असला तरी आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांना मदत करावी, अशी इच्छा सम्यकच्या वडिलांना आहे. वडील धनंजय सांगतात की, त्यांच्या मुलाने नागरी सेवेत रुजू व्हावे आणि लोकांना मदत करावी, हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांनी समीरला मेहनतीत झोकून देऊन ध्येयाकडे वाटचाल करत राहण्याचा सल्ला दिला.
advertisement
आई-वडील यशाचे भागीदार
सम्यक आई-वडिलांना आपल्या यशाचे भागीदार मानतो. भविष्यात आयएएसची परीक्षा देऊन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपले भविष्य घडवायचे आहे. दहावीत संपूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. संकल्पना चांगल्याप्रकारे समजून घेतल्या आणि परीक्षेपूर्वी पेपर्सचा नियमितपणे सराव केला. यामुळे परीक्षेतील प्रश्नांची पद्धत आणि त्यांची उत्तरे देण्याची पद्धत शिकण्यास मदत झाली, असे सम्यक सांगतो.
advertisement
वडिलांचे स्वप्न साकार करावे
सम्यकच्या यशाचे श्रेय त्याच्या शाळेतील शिक्षकांचेही आहे. त्यांनी सम्यकला वेळोवेळी मदत केली. पतीचे स्वप्न आहे की मुलाने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी. हे स्वप्न तो साकार करेल, असे सम्यकची आई सांगतात. या यशानंतर सम्यकचे कुटुंबीय आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
'कुरिअर बॉय'च्या मुलाचं टॅलेंट! RTE तून मिळाला प्रवेश अन् दहावीत मिळवलं मोठं यश, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement