TRENDING:

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! कॉन्स्टेबल पदावरुन झाला थेट डेप्युटी कलेक्टर, अत्यंत प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

दीपक सिंह हे बाराबांकी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सेमराय येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील अशोक कुमार सिंह हे शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहेत. ते 5 भाऊ बहिणींमध्ये दुसऱ्या नंबरवर येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवहरि दीक्षित, प्रतिनिधी
दीपक सिंह
दीपक सिंह
advertisement

हरदोई : “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती” प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या या प्रेरणादायी ओळी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. आयुष्यामध्ये संकटं आल्यावर हार न मानता त्यांचा जिद्दीने सामना करण्यासाठी ही कविता प्रेरणादायी आहे. आज अशाच एका तरुणाबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने हे सिद्ध करुन दाखवले आहे.

advertisement

दीपक सिंह असे या तरुणाचे नाव आहे. दीपक सिंह हे उत्तरप्रदेश पोलीसमध्ये हरदोई येथे कॉन्स्टेबल तैनात आहेत. त्यांनी UPPSC मधून PCS परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि राज्यात 20 वा क्रमांक मिळविला आहे. दीपक सिंह हे बाराबांकी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी कॉन्स्टेबल पदावरुन थेट डेप्युटी कलेक्टर पदावर झेप घेतली आहे.

2018 मध्ये ते उत्तरप्रदेश पोलीस सेवेत भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टींग ही हरदोई येथे झाली होती. तेव्हापासून ते याचठिकाणी सेवेत आहेत. आता ते उपजिल्हाधिकारी झाल्यावर पोलीस विभागातही आनंदाचे वातावरण आहे. तसेच अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहेत. अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे फोन करुन अभिनंदन केले.

advertisement

दीपक सिंह यांनी सांगितले की, आपल्या ध्येयापासून ते भरकटू नये म्हणून त्यांनी आपल्या पलंगाच्या जवळ एक पांढरा बोर्ड ठेवला होता. या बोर्ड त्यांनी मार्कर पेनने SDM लिहिले होते. झोपताना ते बोर्ड पाहायचे आणि त्यांना SDM होण्याचे त्यांचे ध्येय लक्षात राहायचे आणि सकाळी उठल्याबरोबर ते बोर्ड पाहायचे आणि ध्येय गाठण्याच्या दिशेने कामाला लागायचे. ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या प्रवासाचे श्रेय त्यांनी देवासोबतच आई-वडील, चांगले मित्र आणि कुटुंबीयांना दिले.

advertisement

वडील करतात शेती तर आई गृहिणी -

दीपक सिंह हे बाराबांकी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सेमराय येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील अशोक कुमार सिंह हे शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहेत. ते 5 भाऊ बहिणींमध्ये दुसऱ्या नंबरवर येतात. सरकारी नोकरी मिळवणारे आणि अधिकारी झालेले ते आपल्या गावातील आणि कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. गावात मुलगा अधिकारी झाल्याच्या बातमीने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. सर्वजण मोठ्या आनंदात आहेत.

advertisement

फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या, लक्षणे आणि उपाय

4 ते 5 तास द्यायचे वेळ -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दीपक यांनी सांगितले की, पोलीसांच्या नोकरीसोबत पीसीएस परिक्षेच्या अभ्यासासाठी 4 ते 5 तास मिळायचे. यामध्ये ते 10 बाय 10 च्या भाड्याच्या खेलीत राहून अभ्यास करायचे. सोबत पोलीस लाइनमधील लायब्ररीमध्ये जाऊन कठोर मेहनतीने अभ्यास करायचे आणि आता त्यांना त्यांचे फळ मिळाले आहे. जर कुणी अशा परीक्षेची तयारी करत असेल तर सर्वप्रथम त्याला आपले ध्येय निश्चित करावे लागेल आणि स्वप्न पाहण्यास सुरुवात करावी लागेल. जेव्हा स्वप्ने मोठी असतात, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी यश आपोआप येते, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/करिअर/
शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! कॉन्स्टेबल पदावरुन झाला थेट डेप्युटी कलेक्टर, अत्यंत प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल