फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या, लक्षणे आणि उपाय
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महिलांना जसा स्तनाचा कर्करोग होतो, तसा पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो. पुरुषांच्या स्तनऊतींमध्ये कर्करोगाच्या ऊती वाढल्याने स्तन कॅन्सर होतो.
हिना आज़मी, प्रतिनिधी
डेहराडून : अनेकांना माहिती असेल महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांनाही होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर आली आहेत. महिलांना जसा स्तनाचा कर्करोग होतो, तसा पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो. पुरुषांच्या स्तनऊतींमध्ये कर्करोगाच्या ऊती वाढल्याने स्तन कॅन्सर होतो. सुरुवातीला याची लक्षणे लक्षात येत नाही. यामुळे शरीरात हा कर्करोग वाढतो आणि गंभीर स्वरुप धारण करतो.
advertisement
अनेक पुरुष याकडे दुर्लक्षही करतात. स्तनाचा कॅन्सर झाल्याने स्तनऊतींना सर्जरी करुन हटवले जाते. उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील दून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागाचे एचओडी डॉ. दौलत सिंग यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने महिलांमध्ये आढळतो. परंतु काही प्रकरणे पुरुषांमध्ये देखील आढळतात. पुरुषांमध्येही स्त्रियांप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. जसे की स्तनामध्ये गाठ, काखेचा क्षय, स्तनातून रक्तस्त्राव होणे ही त्याची लक्षणे असू शकतात. आपल्या समाजातील पुरुषांमध्ये याबाबत जागृतीचा अभाव असल्याचे ते म्हणाले.
advertisement
या प्रकारच्या हार्मोनल असंतुलनामुळे कर्करोग होऊ शकतो. हे अनुवांशिकरित्या देखील होऊ शकते. एक हार्मोन आधारित रोग आहे, ज्याला क्लाइनफेल्टर सिंड्रोम म्हणतात. यामध्ये, स्ट्रोजेनची पातळी वाढते आणि एंड्रोजनची पातळी कमी होते, ज्यामुळे गायकोमास्टिया होतो आणि मग नंतर यामुळे नंतर स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. अतिमद्यपान करणाऱ्यांसाठीही हा धोका कायम आहे. त्याचे कारण शोधून काढल्यानंतरच त्यावर उपचार होऊ शकतात.
advertisement
पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगावरील उपचार -
महिलांप्रमाणेच पुरुषांनाही स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू शकतात. यामुळे त्याचे उपचार त्यांच्याप्रमाणेच दिले जातात. शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमोथेरपीद्वारे स्तनाच्या कर्करोगाच्या ऊती काढून टाकल्या जातात. म्हणून स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करून घेणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरा. कोणत्याही वापरामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी लोकल18 ची टीम जबाबदार राहणार नाही, कृपया हे लक्षात घ्यावे.
view commentsLocation :
Dehradun,Dehradun,Uttarakhand
First Published :
January 25, 2024 8:53 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या, लक्षणे आणि उपाय


