Griha Pravesh Muhurat 2024 List : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गृहप्रवेशाचे शुभ मुहूर्त, या आहेत महत्त्वाच्या तारखा

Last Updated:

सनातन धर्मात शुभ तारीख आणि शुभ मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी शुभ मुहूर्त असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतात.

फाईल फोटो
फाईल फोटो
परमजीत कुमार
देवघर : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे स्वत:चे एक घर असावे. त्यासाठी व्यक्ती खूप मेहनत घेतो आणि आपले ड्रीम हाऊस बनवतो. मात्र, काही लोक असे असतात, जे कोणताही मुहूर्त न पाहता किंवा शुभ तारीख न पाहता घरात प्रवेश करतात. मात्र, त्यानंतर त्या घरातील व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडायला सुरुवात होते.
advertisement
सनातन धर्मात शुभ तारीख आणि शुभ मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी शुभ मुहूर्त असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतात. देवघरच्या ज्योतिषांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे कोणत्या तारखेला घरात प्रवेश करणे शुभ आहे, जाणून घेऊया?
देवघरच्या पागल बाबा आश्रम स्थित मुदगल ज्योतिषकेंद्राचे प्रसिद्ध ज्योतिषआचार्य पंडित नन्दकिशोर मुदगल यांनी लोकल18 शी संवाद साधताना सांगितले की, खरमास संपल्यानंतर सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतील. शुभ कार्यासाठी शुभ तिथी असणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन घर बांधून त्यात शुभ तिथी आणि शुभ मुहूर्तावर पूजा करून प्रवेश केल्याने घरात सदैव सुख-समृद्धी राहते. सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. यासोबतच देवी लक्ष्मीचा वास असतो.
advertisement
गृह प्रवेशासाठी नवीन वर्षातील शुभ मुहूर्त -
वास्तुशास्त्रानुसार, शुभ तारीख आणि शुभ दिवशी नवीन घरात प्रवेश केल्याने नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातील शेवटच्या तारखेपासून गृहप्रवेशाची शुभ तिथी सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यात फक्त 31 जानेवारी ही गृहप्रवेशाची शुभ तारीख आहे. तर फेब्रुवारी महिन्यात 12, 14, 15, 19, 26, 28 आणि 29 फेब्रुवारी या तारीख शुभ आहेत. यानंतर 2, 6, 11 आणि 13 मार्च या गृहप्रवेशासाठी शुभ तिथी आहेत. यानंतर पुढील महिन्यात शुक्र अस्त करत आहे, त्यामुळे ही तिथी शुभ नाही, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Griha Pravesh Muhurat 2024 List : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गृहप्रवेशाचे शुभ मुहूर्त, या आहेत महत्त्वाच्या तारखा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement