गावातील तलावात आंघोळीसाठी आली परी, पण राजाने गुपचूप चोरले कपडे, ठेवली ही अट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
राजस्थान राज्यातील चुरू हे केवळ प्राचीन हवेल्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर इतिहास, दंतकथा आणि रोमँटिक कथांसाठीही प्रसिद्ध आहे. चूरूच्या घांघू गावातील अशीच एक ऐतिहासिक कहाणी आहे.
नरेश पारीक
चूरू : भारतातील प्रत्येक राज्याला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. यामध्ये राजस्थान या राज्याचाही स्वतःचा इतिहास विविध ऐतिहासिक कथा-कहाण्यांनी भरला आहे. येथील ढाणी या गावाची एक वेगळीच श्रद्धा आहे. आजही गावात गावकरी या ऐतिहासिक कहाण्या सांगतात. असाच एक महत्त्वाची ऐतिहासिक कहाणी आपण आज जाणून घेऊयात.
राजस्थान राज्यातील चुरू हे केवळ प्राचीन हवेल्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर इतिहास, दंतकथा आणि रोमँटिक कथांसाठीही प्रसिद्ध आहे. चूरूच्या घांघू गावातील अशीच एक ऐतिहासिक कहाणी आहे. त्यानुसार इंद्राच्या परी गावात बांधलेल्या तलावात स्नान करण्यासाठी येत असत आणि स्नान करून परत इंद्राकडे जात असत.
advertisement
घांघू गावातील बिरबल कुमार सांगतात की घांघू गावाला एक इतिहास आहे. अजमेरचा राजा अर्णोराज याचा मुलगा घंघराम याने घांघू हे गाव वसवले होते. पौराणिक कथांनुसार गावात एक तलाव असायचा आणि त्याच तलावात इंद्राच्या परी आंघोळ करायला येत. गावाचे शासक राजा घंघराम एका परीच्या प्रेमात पडला आणि मनातल्या मनात घंघरामला ती परी आवडू लागली. जेव्हा घंघरामने आपल्या भावना गावाजवळ राहणाऱ्या एका साधूला सांगितल्या तेव्हा त्या संताने त्याला एक विचित्र युक्ती सांगितली.
advertisement
त्यावेळी त्या संतांनी सांगितले की, जेव्हा परी आंघोळीसाठी तलावावर जातात तेव्हा तुम्ही परीचे कपडे लपवा. घंघरामनेही संताने सांगितल्याप्रमाणेच केले. त्याने परीचे कपडे लपवून ठेवले आणि परीसमोर एक अट घातली की तिच्याशी लग्न केले तरच हे कपडे मिळतील. यानंतर परीने घंघरामचा हा प्रस्ताव मान्य केला.
आख्यायिकेनुसार, विक्रम संवत 969 मध्ये, घंघरामने घांघू गावावर राज्य केले आणि परीशी लग्न केल्यानंतर त्यांना जीणमाता आणि हर्ष का भैरू नावाची दोन मुले झाली. घंघाराम हे चौहान घराण्यातील असून गोगाजीचे पूर्वज घांघू गावातून आल्याची माहितीही गावकरी सांगतात.
view commentsLocation :
Rajasthan
First Published :
January 24, 2024 10:59 AM IST


