'मी तुझ्याकडे अंघोळीला येतेय...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितलं पावसाळ्यात पुण्यात काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Actress : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत मजेशीर क्षणाची आठवण सांगितली आहे.
मुंबई: ग्लॅमरच्या दुनियेत वावरणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल आपल्याला त्यांच्या कामाशिवाय त्यांच्या खासगी आयुष्यात काय चालतं, याबद्दल खूप उत्सुकता असते. आता मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण केलेली अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत मजेशीर क्षणाची आठवण सांगितली आहे.
advertisement
एका मुलाखतीत बोलताना गिरिजा ओकने तिच्या खास मैत्रीबद्दल आणि तिच्या आयुष्यात मैत्रिणींचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याबद्दल भाष्य केले. ती म्हणाली, "जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोनवर हे बोलू शकत असाल की, 'माझ्या घरी पाणी नाहीये, मी तुझ्याकडे अंघोळीला येत आहे', तर यापेक्षा चांगली आणि खरी मैत्री दुसरी कोणती असू शकते?"
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


