जालना : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अनेक ठिकाणी तरुणांसाठी करियर मार्गदर्शक वर्ग भरवण्यात आले. जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानं 15 जुलै रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. जालन्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 14 कंपन्यांचे प्रतिनिधी 551 पदांसाठी मुलाखत घेतील असं नियोजित होतं.
advertisement
या मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी, आय.टी.आय., बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.कॉम, डिप्लोमा व बीई, डिप्लोमा ऑरी, बी.एस्सी. अॅग्री एम.एस्सी. अॅग्री एम.बी.ए., एम.एस.डब्ल्यू, इत्यादी पात्रताधारक नोकरीसाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांसाठी एकूण 551 रिक्त पदांसाठी मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं. या पदांवर निवड करण्यासाठी स्थानिकसह परजिल्ह्यातील विविध 14 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार, तसंच कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध योजनांचं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं नियोजित होतं.
हेही वाचा : वाढप्याचं काम करून पूर्ण केलं शिक्षण, हमालाच्या मुलानं करुन दाखवलं, महाराष्ट्र पोलीसमध्ये झाली निवड
या रोजगार मेळाव्यात जालना एमआयडीसीतील मेटारोल ईस्याट प्रा. लि. कंपनीची 13 पदं, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि.ची 20 पदं, एन.आर.बी. बेअरिंग्ज लिमिटेडची 50 पदं, एस.आर.जे स्टील प्रा. लि.ची 10 पदं, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि.ची 25 पदं, ओम साई मॅनपॉवर प्रा. लि.ची 40 पदं, ओक्रॉप इंजिनिअरिंग प्रा. लि.ची 6 पदं, विनोद रॉय इंजिनिअरिंग प्रा. लि.ची 4 पदं, भूमी कटिक्स इंडस्ट्री प्रा. लि.ची 11 पदं, छत्रपती संभाजीनगरातील धूत ट्रान्समिशन प्रा. लि.ची 150 पदं, नवभारत फर्टिलायझर्स लि.ची 23 पदं, कॅनपॅक इंडिया प्रा. लि.ची 8 पदं, पुण्यातील टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ची 50 पदं, इत्यादी एकूण 551 रिक्त पदांसाठी मुलाखती आणि त्यातून उमेदवारांची निवड व भरतीचं आयोजन करण्यात आलं.
या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. त्यासाठी बायोडाटाच्या किमान 5 प्रती, शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन भुजंग रिठे (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना) यांनी केलं. ज्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली नसेल त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी आणि काही अडचण असल्यास कार्यालयीन दूरध्वनी व व्हॉट्सअॅप क्र. 02482-299013 वर संपर्क साधावा, असंही रिठे यांनी सांगितलं होतं.






