नोकरीसाठी करा अर्ज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे थेट भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी थेट अर्ज करावेत. ही भरती प्रक्रिया पाच रिक्त पदांसाठी होत आहे. अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्र पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच पीएच.डी. धारकांसाठी देखील मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावा लागणार आहे.
advertisement
जबरदस्त प्लेसमेंटसाठी येथून करा बीटेक! 2 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज; पाहा कसं मिळतं अॅडमिशन
कसा कराल अर्ज?
उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी मुख्य अन्वेषक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जिल्हा अहमदनगर, राहुरी या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. 5 जानेवारी 2024 च्या अगोदरच अर्ज या ठिकाणी पोहोचायला हवेत. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्यामुळे उशीर न करता अर्ज करायचे आहेत. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या साईटवर भेट देऊ शकता. तिथे या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.